टीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी

Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 

पुजा पवार | Updated: Feb 19, 2025, 01:06 PM IST
टीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : बहुप्रतीक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे. यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) स्पर्धा जवळपास 8 वर्षांनी आयोजित करण्यात आलेली असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबई येथे खेळवले जातील. टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जाणार असल्याने संपूर्ण भारतीय संघ दुबईत पोहोचला असून त्यांनी मागील काही दिवसांपासून सराव सुरु केला आहे. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 

पाकिस्तानचा राहणारा गोलंदाज अवेस अहमद याने सरावादरम्यान भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना गोलंदाजी केली. अवेस अहमदच्या गोलंदाजीने दोघेही इम्प्रेस झालेले दिसले. इंडिया टुडेशी बोलताना अवेस अहमद म्हणाला की, 'जेव्हा मी गोलंदाजी करत होतो तेव्हा विराट स्ट्राईकवर होता त्यानंतर तो  रोहितशी काही बोलला. रोहितने विराटला विचारले की गोलंदाज बॉल कोणत्या दिशेला स्विंग करत आहे. तेव्हा मी विराटला बोलताना ऐकले की गोलंदाज दोन्ही दिशेला बॉल स्विंग करत आहे. त्यानंतर त्यांनी खूप उत्तम फलंदाजी केली आणि स्ट्रोक मारताना कोणतीही चूक केली नाही'. 

कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट : 

पुढे पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला की, 'नेट सेशननंतर रोहितने माझे कौतुक केले. मी रोहितला गोलंदाजी करत असताना त्याला यॉर्करने धोका देण्याचा प्रयत्न केला होता अगदी तसंच जसं शाहीन आफ्रिदी त्याला गोलंदाजी करतो. नंतर रोहितने मला सांगितले की मी त्याच्या पायाला टार्गेट ठेऊन गोलंदाजी करत होतो आणि या दिग्गज फलंदाजाने केलेल्या स्तुतीमुळे माझा आत्मविश्वास अधिक वाढला'. 

अहमद म्हणाला की, 'भारताचे फलंदाज निश्चितच हा दृष्टिकोन ठेऊन सराव करत होते की त्यांना बांग्लादेशनंतर पाकिस्तानचा सामना करायचा आहे. लोक रोहित शर्मा आणि विराट कोहली याना भेटण्याची स्वप्न पाहतात मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. गोलंदाजी करताना मला भीती वाटली नाही पण मी उत्साहित आणि थोडा नर्वस होतो. मला एक दिवस आधी कळाले होते की मला उद्या भारतीय फलंदाजाला गोलंदाजी करायची आहे'. 

हेही वाचा : युझवेंद्र चहल देणार 600000000 रुपयांची पोटगी? घटस्फोटानंतर धनश्री होणार मालामाल?

पाहा व्हिडीओ : 

कोण आहे अवेस अहमद?

अवेस अहमद हा पाकिस्तानचा रहिवासी असला तरी तो यूएईकडून खेळतो. तो पीएसएलमध्ये लाहौर कलंदर्सचा भाग होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. तो शाहीन अफरीदीच्या गोलंदाजीमधून खूप काही शिकला. त्याने 10 टी20 सामन्यात 13 विकेट घेतले असून टी 10 च्या 23 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतले आहेत. 

टीम इंडिया ग्रुप स्टेज सामने : 

20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश - ठिकाण : दुबई 
23 फेब्रुवारी :  रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान - ठिकाण : दुबई 
2 मार्च  :  रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड - ठिकाण : दुबई