Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला (Champions Trophy 2025) बुधवार 19 फेंरुवारी पासून सुरुवात होणार आहे. तब्बल 8 वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा पहिला सामना यजमान पाकिस्तान विरुद्व न्यूझीलंड (Pakistan VS New Zealand) विरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानने 2017 रोजी झालेल्या शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. यंदा पाकिस्तान आणि दुबईतील मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यजमान पाकिस्तान न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी कशी प्लेईंग 11 निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बुधवार 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. दुपारी 2: 30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून कराची येथील नॅशनल बँक स्टेडियमवर हा सामना पार पडेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तीन वेळा आमने सामने आले आहेत. 2000, 2006 आणि 2009 या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात तीनही वेळा न्यूझीलंडनेच पाकिस्तानचा पराभव केलेला आहे. त्यामुळे याही सामन्यात यजमान पाकिस्तान पेक्षा न्यूझीलंडचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : युझवेंद्र चहल देणार 600000000 रुपयांची पोटगी? घटस्फोटानंतर धनश्री होणार मालामाल?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हे सामानाने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवले जातील. तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पारपडेल.
मोहम्मद रिजवान (कर्णधार आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आजम, साउद शकील, सलमान अली आगा, खुशदिल शाह, तैयब ताहिर, शाहीन अफरीदी, नसीम शाह, अबरार अहमद, मोहम्मद हसनैन.
डेवोन कॉन्वे, विल यंग, केन विलियम्सन, डेरिल मिचेल, टॉम लाथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर (कर्णधार ), माइकल ब्रेसवेल, नाथन स्मिथ, जैकब डफी, विलियम ओ'रूर्के.
सामने : 118
पाकिस्तानने जिंकलेले सामने : 61
न्यूझीलंडने जिंकलेले सामने : 53
टाय झालेले सामने : 3