बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरने (Prateik Babbar) नुकतंच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीशी (Priya Banerjee) काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. प्रतीक बब्बरची आई आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडला. प्रतिकचा सावत्र भाऊ आर्या बब्बरने एका मुलाखतीत कुटुंबातील कोणालाही त्याने लग्नाचं निमंत्रण दिलं नव्हतं असा खुलासा केला आहे. दरम्यान एका स्टँडअप कॉमेडीमध्ये त्याने बब्बर कुटुंबात असंही अनेक लग्नं करण्याचा इतिहास आहे असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे.
बब्बर तो शादी करते है? (Babbar Toh Shaadi Karte Rhte HAIN?) असं शीर्षक असणाऱ्या कार्यक्रमात त्याने उपहासात्मक विधान केलं आहे. त्याने सांगितलं की, "मी सहमत आहे. माझ्या वडिलांचं दोन वेळा लग्न झालं. माझ्या बहिणीचं दोन वेळा लग्न झालं आहे. तसंच आता माझा भाऊ आता दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकत आहे. माझा कुत्राही आनंदी आहे, कारण त्याच्या दोन गर्लफ्रेंड आहेत. त्यामुळे मलाही दुसऱं लग्न करण्यात काही त्रास नाही. पण मी घटस्फोटानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी हाताळण्यासाठी फार आळशी आहे".
प्रतीकच्या लग्नाला आमंत्रित न करण्याबद्दल मीडियाच्या प्रश्नांना कसं उत्तर द्यावं याबद्दल आर्याने त्याचे वडील राज बब्बर यांच्याकडून सल्ला मागितला असता त्यांनी काय उत्तर दिलं हेदेखील आर्याने उघड केलं आहे. "त्यांना सांग, मर्द तो शादी करते हैं (पुरुष लग्न करत राहतात)," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचा खुलासा आर्या बब्बरने केला आहे.
याआधी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत, आर्या बब्बरने कशाप्रकारे संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित करण्यात आलं नाही याबद्दल सांगितलं. त्याने या निर्णयावरुन असलेल्या संभ्रमाबद्दल सांगितलं. मला वाटलं होतं की मी आणि माझा भाऊ फार जवळ आहोत अशी खंतही त्याने व्यक्त केली.
त्याने म्हटलं की, "मला वाटतं आहे की कोणीतरी त्याच्या डोक्यात खूप काही भरलं आहे. त्याला कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधावा असं वाटत नाही आहे. त्याने कोणालाही फोन न करण्याचा निर्णय घेतला".
प्रतीकला आपली आई नादिरा बब्बरला (सावत्र आई) आमंत्रित करण्याची इच्छा का नव्हती? हे समजत असताना, त्याने किमान वडील राज बब्बर यांना आमंत्रित करायला हवं होतं असंही तो म्हणाला. "आयुष्य हे एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही; घरातील कोणीतरी त्याच्यावर प्रभाव टाकत आहे. मला तो प्रतीक आहे असं वाटून घ्यायचं नाही आणि तो असा आहे यावर माझा विश्वास नाही," असंही त्याने सांगितलं.
प्रतीक हा ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. स्मिता पाटील यांच्या अकाली मृत्यूनंतर राज बब्बर यांनी नादिरा बब्बरशी लग्न केलं आणि त्यांना आर्य बब्बर आणि जुही बब्बर ही दोन मुले झाली. प्रिया बॅनर्जीपूर्वी प्रतीकचे लग्न सान्या सागरसोबत झाले होते. 2019 मध्ये त्यांनी लग्न केले पण 2023 मध्ये घटस्फोट झाला.