Ajay Devgn पुन्हा म्हणणार 'आता माझी सटकली', Singham Again ची चाहूल लागली, जाणून घ्या तारीख!

Ajay Devgn in Singham Again: सिंघमच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 14, 2023, 04:03 PM IST
Ajay Devgn पुन्हा म्हणणार 'आता माझी सटकली', Singham Again ची चाहूल लागली, जाणून घ्या तारीख!  title=
Ajay Devgn, Rohit Shetty,Singham Again

 Ajay Devgn's Singham Again Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) याची जोडी बॉक्स ऑफिसवर नेहमी हिट ठरल्याचं पहायला मिळतं. हीच सुपरहिट जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. 'सिंघम' आणि 'रिंघम रिटर्न्स' या 2 सिनेमामुळे अजय देवगण पुन्हा झळकला होता. त्यानंतर आता अजय देवगण पुन्ह्यांदा 'आता माझी सटकली' म्हणताना दिसणार आहे. कारण अजय देवगणचा सिंघम अगेन (Singham Again) हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

सिंघमच्या या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिंघमचा नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अशी चर्चा होती. त्यानंतर आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (Singham Again Ajay Devgn  Rohit Shetty copverse to hit theatres on diwali festival know details)

आणखी वाचा - Ajay Devgn ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, काजोललाही बसेल धक्का

कधी रिलीज होणार Singham Again?

रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांचा 'सिंघम अगेन' हा सिनेमा 2024 या वर्षी दिवाळीत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. येत्या जुलै महिन्यात अजय देवगण या सिनेमाच्या शुटिंगसाठी तयारी करणार असल्याचं समजतंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दरम्यान, 2011 साली सिंघम सिनेमा आला होता. त्यात अजयचा मराठमोळा लूक असल्याने अनेकांना त्याचा लूक भावला. तर त्याच्या बॉडीची प्रसंशा देखील झाली होती. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर आधारित 2014 साली सिंघम रिटर्न रिलीज झाला. त्यानंतर आता 2023 मध्ये सिंघम अगेन येण्याची शक्यता आहे.