मुंबई : अभिनेता सोनू सूदने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान अनेक प्रवासी कामगार आणि गरजू लोकांना मदत केली. मदतीची ही मालिका आजही कायम आहे. परंतु आता कोरोना साथीची परिस्थिती आणखी भयानक बनली आहे आणि लोकांची मदत करण्यासाठी सोनू सूद प्रयत्नशील आहे. सोनू सूदने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स बाबत चीनला प्रश्न विचारला ज्याचे उत्तर चीनकडून आले आहे.
सोनू सूदला एकाने टॅग केले आणि सांगितले की शेकडो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स चीनमधून भारतात आणायची आहेत, परंतु चीन त्यात अडथळे निर्माण करीत आहे. त्यानंतर सोनू सूदने ट्विट करत थेट चीनला प्रश्न विचारला. आपल्या ट्विटमध्ये सोनू सूदने म्हटलं की, 'आम्ही शेकडो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारतात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे सांगताना खेद वाटतो आहे की चीनने आमच्या बर्याच गोष्टी रोखल्या आहे आणि दर मिनिटाला येथे भारतात जीवन संपत आहे. 'सोनू सूदने ट्विटद्वारे चिनी राजदूत आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयालाही टॅग केले आहे.
We are trying to get hundreds of oxygen concentrators to India. It's sad to say that China has blocked lots of our consignments and here in India we are losing lives every minute. I request @China_Amb_India @MFA_China to help us get our consignments cleared so we can save lives
— sonu sood (@SonuSood) May 1, 2021
चीनचे उत्तर
यावर आता चिनी राजदूत सुन वेइदांग यांनी लिहिले की, 'मिस्टर सूद आपल्या ट्विटरवरून माहिती मिळाली. कोविड 19 च्या युद्धात चीन भारताला पूर्णपणे मदत करत करेल. माझ्या माहितीनुसार, चीन ते भारत दरम्यान सर्व मालवाहू उड्डाण मार्ग सामान्य आहेत. गेल्या दोन आठवड्यांत चीन आणि भारत दरम्यान मालवाहतूक उड्डाणे योग्य मार्गाने सुरू आहेत.'
@SonuSood Noted your twitter info. Mr. Sood. China will do its utmost to support India fighting Covid-19. To my knowledge,freight air routes from China to India are operating normally. The past two weeks have witnessed 61 freight flights from China to India in operation.
— Sun Weidong (@China_Amb_India) May 1, 2021
सोनू सूदने मानले आभार
सोनू सूदने यावर म्हटलं की, 'तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ही समस्या सोडविण्यासाठी मी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधत आहे. तुम्ही करत असलेल्या काळजीबद्दल तुमचे आभार.'
Thanks for the promt response sir. I am in touch with your office to solve the problems. Appreciate your concern. Warm regards. https://t.co/lmjtEYzlXn
— sonu sood (@SonuSood) May 1, 2021