मुंबई : बॉलिवूड अभिनेते अथवा अभिनेत्री अवॉर्ड शोमध्ये नेहमीच हटके अवतारात दिसत असतात. या अवॉर्ड शोमधील त्याच्या लुकची चर्चा व्हावी यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न असतो. शक्यतो काही अभिनेत्री पारंपारीक पद्घतीचे कॉस्ट्युम घालत असतात. मात्र या अभिनेत्रीने तर हद्दच केली, थेट बिकिनी घालून ती रेड कार्पेटवर दाखल झालीय. या अभिनेत्रीचे फोटो आता व्हायरल होतायत.
वरती ज्या अभिनेत्री बद्दल बोललं जात होत ही दुसरी तिसरी कोणी नसून तापसी पन्नू (Taapsee pannu) आहे. तापसी पन्नू दिवसेंदिवस बोल्ड होत चालली आहे. याचाच पुरावा म्हणजे अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक आहे. परदेशातील एका चित्रपट महोत्सवात अलिकडेच तापसी पन्नू पोहोचली होती. या महोत्सवात रेड कार्पेटवर तापसी पन्नूने (Taapsee pannu) बिकनी घातली होती. या तिच्या लुकची आता चर्चा रंगलीय.
लुक काय?
तापसी पन्नूने (Taapsee pannu) काळ्या रंगाच्या बिकिनीवर काळ्या जाळीचे कापड घातलेले दिसले. यासोबतच अभिनेत्रीने काळ्या रंगाचा कोट घातलेला दिसला. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, तापसीने केसांचा बन बनवला आहे. विशेष बाब म्हणजे या अवतारातही अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर पोज देण्यास अजिबात संकोच केला नाही, याउलट कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर पोज देताना ती दिसली. रेड कार्पेटवर या बोल्ड लूकमध्ये अभिनेत्रीला पाहून सर्वांनाच धक्का बसला.
तापसी पन्नूचा (Taapsee pannu) दोबारा हा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नू व्यतिरिक्त या चित्रपटात पावेल गुलाटी देखील आहे. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला असून एकता कपूरने निर्मिती केली आहे. अनुराग कश्यपसोबत तापसी पन्नूचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी अनुराग कश्यपने 'मनमर्जियां' आणि 'सांड की आँख' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.