IIT Baba Prediction IND vs PAK: क्रिकेट विश्वातील महामुकाबला म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 23 फेब्रुवारीला सामना होणार आहे. या मालिकेची पाकिस्तान संघाने पराभवाने सुरुवात केली आहे, तर टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात दमदार विजयाने केली आहे. दरम्यान रविवारी होणाऱ्या महामुकाबल्याच्या आधी महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभय सिंहने या सामन्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत बाबाने केलेली ही मोठी भविष्यवाणी भारतीय चाहत्यांना धक्का देणारी आहे. त्याच्या या अंदाजाने भारतीय ते त्यांच्यावर संतापले.
महाकुंभ मेळा 2025 मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या 'IIT बाबा'ने एका व्हिडीओमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार , आगामी सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध जिंकू शकणार नाही. व्हिडीओमध्ये 'आयआयटी बाबा' बोलताना दिसत आहेत की, "मी तुम्हाला आधीच सांगतोय, यावेळी भारत जिंकणार नाही." त्याने विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंनाही टोला लगावला आणि प्रत्येकाने सर्वतोपरी प्रयत्न केले तरीही पण भारत जिंकणार नाही, असेही तो बोलताना दिसत आहे.
आपल्या दाव्याला पुन्हा बोलत बाबा पुढे म्हणाले, "आता मी मनाशी ठरवलं आहे की भारत जिंकणार नाही तर नाहीच जिंकणार , आता बघू देव मोठा की तू मोठा." असे विराट कोहलीचे नाव घेत तो म्हणाला, "आता तुम्ही जिंकवून दाखवाच." या व्हिडीओने भारतीय चाहते संतप्त झाले, त्यानंतर 'आयआयटी बाबा'ला सोशल मीडियावर टार्गेट केले जात आहे.
व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये भारतीय चाहते आयआयटी बाबांला खूप ऐकवत आहेत. "हा बाबा पाकिस्तानचा आहे का?"," विराटला चॅलेंजेस आवडतात, बघू कोण जिंकतं..." अशा कमेंट्स या व्हिडीओच्या खाली चाहत्यांनी केल्या आहेत.
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दमदार खेळ दाखवला. टीम इंडियाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव करत या मालिकेची शानदार सुरुवात केली. शुभमन गिलचे शानदार शतक (नाबाद 101) आणि मोहम्मद शमीच्या 5 विकेट्सने या सामन्याला चार चांद लावले.तर दुसरीकडे, पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानविरुद्धचा पुढचा सामना जिंकून टीम इंडिया उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करेल.