मुंबई : तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर अनेक स्त्रीया पुढे येऊन खुलेपणाने बोलत आहेत. #MeToo मोहिमेअंतर्गत अभिनेत्री, सहाय्यक कलाकार पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. असंख्यजण त्यांना पाठींबाही देताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही याची खुलेपणाने चर्चा होऊ लागली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील प्रसिद्ध व्यक्तिरेखा असलेली 'बबीता' म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता हीने देखील याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलीयं.
छत्तीसगडच्या बिलासपुरमध्ये आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात मुनमुन दत्ता सहभागी झाली होती.
यावेळी तिने #MeToo मोहिमेला आपला पाठींबा दर्शवला. प्रत्येक महिला वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्य्यावर लैंगिक शोषणाचे बळी ठरतात. ज्या पुढे येऊन बोलत आहेत त्यांना आपण पाठींबा द्यायला हवा.
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आपल्यावर होणारे आरोप पाहता नानांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला.
पण, त्यांचा सहभाग असणाऱ्या या चित्रपटातील काही महत्त्वाच्या दृश्यांचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.
त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना या साऱ्याचा फटका खऱ्या अर्थाने बसला असंच म्हणावं लागेल.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाना पाटेकर यांच्या जागी 'हाऊसफुल्ल 4' मध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ यांची वर्णी लागली आहे.
पण, तरीही नानांचा सहभाग असणाऱ्या दृश्यांना वगळण्यात येणार नसल्याचं आता म्हटलं जात आहे.