Chhavi Mittal : ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी चे व्रण दाखवत 'ह्या' अभिनेत्रीनं Flaunt केला व्हाईट बिकीनी लूक! चाहत्यांकडून कौतुकचा वर्षाव

Chaavi Mittal Beach Photo with surgery Scar: बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन सेलिब्रेटी सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात आणि आपले वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटोज ते इन्टाग्रामवर (Instagram) शेअर करत असतात. 

Updated: Dec 29, 2022, 05:22 PM IST
Chhavi Mittal : ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी चे व्रण दाखवत 'ह्या' अभिनेत्रीनं Flaunt केला व्हाईट बिकीनी लूक! चाहत्यांकडून कौतुकचा वर्षाव title=
chaavi Mittal

Chaavi Mittal Beach Photo with surgery Scar: बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन सेलिब्रेटी सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात आणि आपले वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटोज ते इन्टाग्रामवर (Instagram) शेअर करत असतात. अशाच एका अभिनेत्रीनं आपला एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तिनं आपल्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीनंतरचा (Breast Cancer Surgery) फोटो शेअर केला आहे. यात तिच्या सर्जरीच्या जखमा दिसत असून तिनं बिकीनी घालून तो फोटो एका बीचवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा फोटो तिनं नुकताच इन्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो तिनं दुबईच्या (Dubai Beach) बिचवर क्लिक केला आहे. आपल्या बेकलेस व्हाईट बिकीनीचा लुक तिनं यावेळी फ्लॉन्ट केला आहे. (Television actor Chaavi Mittal shares her breast cancer scar mark photo on instagram wearing a white bikini on dubai beach)

व्हाईट बिकीनी मध्ये तिनं आपला बेकसाईड फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्माईल करत पोझ देते आहे. तिच्या पाठच्या बाजूला तिनं एक टॅटूही काढला आहे. या फोटोत ती खूप आनंदही दिसते आहे. तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवर हा फोटो शेअर करत कॅपश्नमध्ये लिहिले आहे की, या वर्षात मी हे कमावलं आहे. एक नवीन आयुष्य, जे अत्यंत सुंदर आणि कणखर आहे. तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोवर चांगल्या कमेंट्स केल्या आहेत ज्यावर खुद्द छावीनंही रिप्लाय दिला आहे. एका कमेंटमध्ये ती म्हणते की, तुमच्या प्रेमाच्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद!  

यावर्षीच्या एप्रिलमध्ये छावीला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. ती आपल्या रिकव्हरीचे फोटो इन्टाग्रांमवर शेअर करते आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं असं सांगितलं की मी माझ्या आजाराच्या रिकव्हरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते आहे. याला खूप धाडस लागतं कारण मला कर्करोग निदान झाल्यावर कोणीच असं सांगितलं नाही की या आजारानंतरच आयुष्य कसं असतं. सगळ्यांनीच मला वेगवेगळ्या थेरपींबद्दल सांगितलं. पण मी जे अनुभवतंय ते खूप वेगळं आहे. त्याचसोबत मी माझ्या डॉक्टरसोबतही हेही सतत विचारते की माझं आयुष्य या आजारानंतर कसं राहिलं. तेव्हा मी माझ्या हरएक पोस्ट शेअर करत असते. मी आपलं आयुष्य हे ट्रीटमेंटनंतरही चांगलंच आहे. त्यात काहीच गंभीर नाही. हा आज गंभीर आहे पण त्याचं वेळीच निदान झालं ते तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडू शकता. 

पाहा फोटो 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा - Salman Khan ला 'स्टार' बनवणारा निर्माता काळाच्या पडद्याआड!

चाहत्यांचा पांठिबा 

चाहत्यांनीही तिच्यासाठी सदिच्छा सांगितल्या आहेत. अनेक युझर्सनी तिच्या फोटोंवर भरपूर पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर तिच्या धैर्याचे सर्वांनीच कौतुक केले आहे. युझर्स म्हणतात की, तु ज्या पद्धतीनं इतक्या मोठया आजारातून बाहेर येते आहेस ते पाहून तुझ्या धाडसाला सलाम, अशीच धाडसी राहा तूला तुझ्या आयुष्यात चांगले बळ मिळो हिच सदिच्छा. तुझ्या हिमतीला सलाम द्यायला हवा. तू खूप कठीण परिस्थितीतून जात आहेस. तुला तुझ्या कामात चांगले यश मिळो यासाठी सदिच्छा. तर तु लवकरात लवकर बरी होईशील. तुला चांगलं बळ मिळो आणि तुला खूप सदिच्छा मिळो. अशा काही कमेंट्स तिच्या इन्टाग्राम पोस्टवर तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. एक विवाह... ऐसा भी (Ek vivah aisa Bhi), तुम्हारी दिशा (Tumhari Disha), एक चुटकी आसमान (Ek Chutki Asman) अशा लोकप्रिय प्रोजेक्ट्समधून काम केलं आहे.