उर्वशी रौतेलाने तलवारीने कापला केक, व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केला अभिनेत्रीला हा प्रश्न

उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

Updated: Jan 18, 2022, 08:30 PM IST
उर्वशी रौतेलाने तलवारीने कापला केक, व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केला अभिनेत्रीला हा प्रश्न title=

मुंबई : उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या मेहनतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं नाव कमावलं आहे. उर्वशी रौतेला कधीही तिच्या चाहत्यांना निराश करत नाही.  उर्वशी तिच्या जबरदस्त फॅशनसेन्स आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच वर्चस्व गाजवते. यामुळेच उर्वशीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. पुन्हा एकदा उर्वशीचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. जो पाहून तिच्या चाहत्यांना कमालीचा धक्का बसतोय. खरंतर आपण सगळेजणच लहान चाकूने केक कापतो. मात्र उर्वशी तिच्या ताज्या व्हिडिओमध्ये मोठ्या तलवारीने केक कापताना दिसत आहे.

उर्वशी मोठ्या मेहनतीने हा केक कापताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी गोल्डन ड्रेसमध्ये दिसत आहे. हाय पोनी आणि ग्लॅमरस मेकअप उर्वशीला आणखीनच आकर्षक बनवत आहे. उर्वशीच्या या ड्रेसची किंमत जवळपास 15 लाख रुपये आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ शेअर करत उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर एक कॅप्शनही लिहिलं आहे. तिने लिहिलंय की, "प्रत्येक केकची एक स्टोरी असते. आयुष्यातील आणखी एक सुंदर क्षण. लव एट फर्स्ट बाइट". उर्वशीच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. एका चाहत्याने 'तुम्ही तिथे आहात म्हणून मला बॉलीवूड आवडतं' असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या एका चाहत्याने ' हा केक कशाचा बनला आहे', असा प्रश्न विचारला आहे. याशिवाय चाहते हार्ट इमोजी पोस्ट करून उर्वशीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.