किडनी स्टोनचा त्रास 'या' वनस्पतीच्या दोन पानांद्वारे होईल दुर; आत्ताच या उपचाराविषयी जाणून घ्या

प्रथिने, मीठ आणि साखरयुक्त आहाराचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते. पानफुटीच्या दोन पानांच्या वापराने तुम्ही मुतखड्यापासून बचाव करु शकता. तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास होतो का? मग तुम्हाला पानफुटी या वनस्पतीबद्दल माहिती करून घ्यायलाच हवे.

Updated: Jan 26, 2025, 03:39 PM IST
किडनी स्टोनचा त्रास 'या' वनस्पतीच्या दोन पानांद्वारे होईल दुर; आत्ताच या उपचाराविषयी जाणून घ्या  title=

Natural treatment for kidney stone removal: प्रथिने, मीठ आणि साखरयुक्त आहाराचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते. आजकाल किडनी स्टोन गंभीर आजारांपैकी एक आहे. ही समस्या असलेल्या रुग्णाना बरगडी खाली. कमरे जवळ खूप वेदना होतात. तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास होतो का? मग तुम्हाला पानफुटी या वनस्पतीबद्दल माहिती करून घ्यायलाच हवे. कारण सहज मिळणारी पानफुटी ही वनस्पती किडनीच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. किडनी स्टोनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पानफुटी वनस्पतीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता.

किडणी स्टोन हाण्यामागची कराणे

  • पाणी कमी पिणे,
  • युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे
  • कॅल्शियमच्या जास्त गोळ्या घेणे
  • साखरे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे
  • सोडियमचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे

पानफुटीची पाने वापरण्याची पद्धत आणि उपाय

1. पानफुटी वनस्पतीचा एक पान घ्या.
2. त्यामध्ये थोडीशी खडी साखर घाला.
हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चांगले वाटून घ्या.
4. दररोज या मिश्रणाचे सेवन केल्याने मुतखड्याची समस्या दूर होऊ शकते

कोमट पाण्यासोबत घ्या फ्कत दोन पाने

1. पानफुटी वनस्पतीची दोन पानं घ्या.
2. ती स्वच्छ धुवून घ्या.
3. नंतर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत ही पाने चावा.
4. हे रोज केल्यास किडनी स्टोनच्या त्रासातून दुर होण्यास मदत मिळते.

हे ही वाचा: गाजर हलवा खाताना तुम्ही देखील करताय 'ही' चूक? आरोग्यावर होतो थेट परिणाम

योगासनांनाही दिनचर्येचा भाग बनवा

पानफुटी वनस्पतीचा उपयोग करण्यासोबतच काही योगासनांचादेखील तुमच्या दिनचर्येत सामवेश करा. आयुर्वेदानुसार, योगमुद्रासन, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, कपालभाती, आणि अनुलोम-विलोम यांसारखी योगासने किडनी स्टोनपासून सुटका मिळवण्यास उपयुक्त ठरतात. ही योगासने कोणत्याही योग्य मार्गदर्शकाच्या देखरेखीखालीच करावी, हे लक्षात घ्या.