Urvashi Rautela च्या आईची झलक ठरतेय 'सबसे अलग...' , का होतेय अशी चर्चा

काही लोक उर्वशीची आई अभिनेत्रीची बहीण असल्याचे समजत आहेत. 

Updated: Jan 2, 2022, 08:20 PM IST
  Urvashi Rautela च्या आईची झलक ठरतेय 'सबसे अलग...' , का होतेय अशी चर्चा title=

मुंबई : सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4 आणि पागलपंती यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला कोणत्याही ओळखीत रस नाही. आपल्या सौंदर्याने आणि तिच्या हॉट स्टाईलने सोशल मीडियावर खळबळ माजवणाऱ्या उर्वशीने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मिस युनिव्हर्स इंडियाचा ताज जिंकला होता.

काळानुसार फिल्मी दुनियेत खास स्थान निर्माण करणाऱ्या उर्वशी रौतेलाच्या स्टाईल आणि फॅशनचेही कौतुक होते. उर्वशीच्‍या वैयक्तिक किंवा व्‍यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे ती चर्चेत असते. पण सध्या चर्चा आहे ते तिच्या आईची. उर्वशी रौतेलाच्या आईचे नाव मीरा रौतेला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशीच्या आईचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्रीने तिच्या आईचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीच्या आईला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांची ग्लॅमरस स्टाईल लोकांचे लक्षवेधून घेत आहे. काही लोक उर्वशीची आई अभिनेत्रीची बहीण असल्याचे समजत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशीची आई मुलीप्रमाणेच तितकीच स्टायलिश आहे.अभिनेत्रीने याआधीही तिच्या आईचे फोटो शेअर केले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीरा रौतेला यांच्या सौंदर्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. उर्वशी रौतेलाची आई भारतीय ते वेस्टर्न ड्रेस अगदी सहज कॅरी करताना दिसतात.