Vaibhav Tatwawadi on Prajakta Mali crush statement : बॉलिवूड अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक आहे. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत लोकप्रिय मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) हा तिचा क्रश असल्याचे म्हटले होते. 'कॉफी आणि बरंच काही' (Coffee Ani Barach Kahi) या चित्रपटामुळे प्राजक्ताला तो आवडू लागला होता. इतकंच काय तर तिनं थेट तिच्या आईला वैभव तुला जावई म्हणून चालेल का? असा प्रश्न देखील विचारला होता. त्यावर आता वैभव तत्ववादीनं यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत वैभव तत्ववादी हा तिचा क्रश होता असा खुलासा केला होता. त्यावेळी 'कॉफी आणि बरंच काही’ चित्रपटानंतर तिला तो आवडू लागला आणि त्यानंतर त्या दोघांनी एका चित्रपटात काम केलं. मग त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण पुढे प्राजक्तानं सांगितलं होतं की तो आता तिचा क्रश राहिलेला नाही. ते दोघं चांगले मित्र आहेत.
वैभवनं नुकतीच एका मराठी वेब पोर्टलला मुलाखत दिली होती. त्यावेळी वैभव प्राजक्ताचं क्रश असण्याच्या वक्तव्यावर बोलला आहे. 'मला प्राजक्ताने स्वत: मुलाखतीतील तो व्हिडीओ पाठवला होता. मी तुझ्याबद्दल असं बोलली आहे, हे तिने मला सांगितलं. एका सुंदर मुलीने क्रश असल्याचं सांगितल्यावर एका मुलाच्या ज्या भावना असतील. त्याच माझ्या होत्या', असं वैभव म्हणाला.
हेही वाचा : 25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली...
दरम्यान, जेव्हा या प्रकरणात आधी वैभवला विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यानं सांगितलं होतं की प्राजक्तानं तिच्या आईकडे माझ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला हे तिनं मला कधी सांगितलं नव्हतं. ही गंमतीशीर गोष्ट आहे. लोक त्या दोघांना तुम्ही लग्न कधी करणार असा सवाल विचारतात. तर प्राजक्तानं हे गंमतीत वक्तव्य केलं होतं. त्या दोघांमध्ये काही नसून ते चांगले मित्र आहेत. हे देखील तिनं पुढे सांगितलं होतं.
वैभवच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘सर्किट’ या चित्रपटात दिसला आहे. हा चित्रपट 7 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटात वैभवसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि मिलिंद शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश पेंढारकर यांनी केले आहे.