ना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?

Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आपली सह-अभिनेत्री रश्मिका मंधानासह (Rashmika Mandanna) पाटण्यात दाखल झाला. पाटण्यातच अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 17, 2024, 09:12 PM IST
ना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?  title=

Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun), रश्मिका मंधाना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक काळापासून चित्रपटप्रेमींना या ट्रेलरची उत्सुकता होती. करोना काळात रिलीज झालेल्या पुष्पा चित्रपटाने संपूर्ण भारतभर अक्षरश: गदारोळ केला होता. तेव्हापासून सर्वांना 'पुष्पा 2'ची उत्सुकता होती. बिहारची राजधानी पाटण्यातच अल्लू अर्जून, रश्मिका आणि इतरांच्या उपस्थितीत 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दरम्यान अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे. 

अल्लू अर्जूनसाठी 17 हा फार लकी नंबर आहे. पाटण्यातील गांधी मैदानात 'पुष्पा 2' चित्रपटाला ट्रेलर रिलीज करण्यात आला. 6 वाजून 3 मिनिटांनी हा ट्रेलर रिलीज झाला. दरम्यान पाटणा शहर आणि ही वेळ निवडण्यामागे काही खास कारणं होती, ती समोर आली आहेत. 

पाटण्यात ट्रेलर रिलीज का केला?

'पुष्पा 2' चित्रपटाला जर मोठं यश मिळवायचं असेल तर निर्मात्यांना अशा प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणावं लागेल जे हिंदी चित्रपटांना सुपरहिट करणारे मास ऑडियन्स म्हणून ओळखले जातात. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, बंगाल, ओडीशा, मध्य प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांमधील अनेक छोट्या शहरातील लोक काही मोजक्या चित्रपटांची वाट पाहत असतात. पुष्पा 2 चित्रपट अशा प्रेक्षकांसाठी अगदी योग्य आहे. 

'पुष्पा'च्या यशामागे हिंदी प्रेक्षकांचा फार मोठा वाटा आहे, ज्याचा निर्माते 'पुष्पा 2' साठीही वापर करण्यास इच्छुक आहेत. 'पुष्पा 1: द राइज' चित्रपटाने बिहार आणि उत्तर प्रदेशात सिंगल स्क्रीनवर जोरदार कमाई केली होती. चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्याचं एका स्थानिक गायकाने भोजपुरी व्हर्जन आणलं होतं, जे सुपरहिट झालं होतं. 

अलीकडेच राम चरणने लखनऊमध्ये त्याच्या आगामी 'गेम चेंजर' चित्रपटाच्या टीझर लाँचिंगचा कार्यक्रमही केला. पण पाटण्यासारख्या सामान्य देशी हिंदी बाजारात, वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'पुष्पा 2'चा ट्रेलर लॉन्च इव्हेंट हा अल्लू अर्जुनचा प्रेक्षकांना थेट संदेश आहे - 'मी तुमच्या मनोरंजनासाठी येथे आहे..