Sadhvi Prachi on Swara Bhaskar Marriage: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे फहाद अहमद (Fahad Zirar Ahmed) यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान स्वरा भास्करने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने विश्व हिंदू परिषदेचे नेत्या साध्वी प्राची (Vishva Hindu Parishad Leader Sadhvi Prachi) यांनी टोला लगावला आहे. तिने आधी पतीच्या घरातील फ्रिज पाहायला हवा होता असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे. साध्वी प्राची यांनी अप्रत्यक्षपणे श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walkar Murder) प्रकरणाचा दाखला दिला आहे. श्रद्धाची तिचाच प्रियकर आफताब पूनावालाने (Aftab Poonawala) हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते.
"स्वरा भास्कर नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात होती. ती आपल्या धर्माच्या बाहेरील व्यक्तीशी लग्न करणार याची मला खात्री होती. तिने एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न केलं आहे," असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे.
"कदाचित स्वरा भास्करने कशाप्रकारे श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले होते, याकडे लक्ष दिलं नव्हतं. तिने हा मोठा निर्णय घेण्याआधी त्याच्या घरातील फ्रिज पाहायला हवा होता," असा सल्ला साध्वी प्राची यांनी दिला आहे. हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे असं सांगताना जे श्रद्धासह झालं तसंच स्वरासोबतही होऊ शकतं असंही म्हटलं.
16 फेब्रुवारीला स्वरा भास्करने आपण सामाजिक कार्यकर्ते फहाद झिरार अहमद यांच्याशी लग्न करत असल्याची घोषणा केली. तिने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओही शेअर केले होते.
"कधी कधी जे आपल्या जवळ असतं त्यासाठी आपण खूप दूरवर शोध घेत असतो. आम्ही प्रेमाचा शोध घेत होतो, पण आम्हाला आधी मैत्री मिळाली. नंतर आम्ही एकमेकांना भेटलो! माझ्या हृदयात स्वागत आहे फहाद झिरार अहमद. इथे थोडा गोंधळ आहे, पण हे तुझेच आहे," अशी पोस्ट स्वराने शेअर केली होती.