कियारानं ओलांडली हद्द, म्हणाली मी वायब्रेटर...

अभिनेत्री कियारा अडवाणी ही पॉप्यूलर एक्ट्रेसपैकी एक आहे.

Updated: Feb 10, 2022, 04:25 PM IST
कियारानं ओलांडली हद्द, म्हणाली मी वायब्रेटर...  title=

मुंबई : अभिनेत्री कियारा अडवाणी ही पॉप्यूलर एक्ट्रेसपैकी एक आहे. आपल्या कमी वेळेत अभिनेत्रीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  कियाराने 'लस्ट स्टोरीज' सिनेमात मास्टरबेशन सीन देऊन  खळबळ माजवली होती. जो चर्चेचा विषय ठरला होता. या सीनसाठी तिने भरपूर तयारीदेखील केली होती. तिने स्वत: सांगितलं होतं की, ती गूगलवरुन शिकलीये की वाईब्रेटरचा  वापर कसा करावा.

गूगलवरुन शिकली वाइब्रेटरचा यूज
नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर' या चॅट शोमध्ये मास्टरबेशन सीनच्या तयारीबद्दल कियार अडवाणी उघडपणे बोलली. हा सीन करण्यासाठी निर्माता करण जोहरने तिला खूप मदत केल्याचं तिने सांगितलं होतं. ती म्हणाला, करणने आम्हा सर्वांना सांगितलं काय करायचं? जरी मला वाटलं की, ते माझ्यासाठी खूप वेगळं असेल, मला खरोखर या डिव्हाइसबद्दल काहीही माहित नव्हतं.त्याबद्दल जाणून घेण्यासाठी मला गुगल करावं लागलं. त्यानंतर 'द नेक्स्ट ट्रुथ' आणि काही सिनेमे पाहून मला याची कल्पना आली. त्यानंतर मी हा सीन चांगला करण्याचा प्रयत्न केला आणि मला जास्त काही लागलं नाही.

फिल्म पाहून कशी होती फॅमिली रिएक्शन?
याआधी कियाराने दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिच्या कुटुंबाला चित्रपट कसा वाटला हे सांगितले होतं. ती म्हणाली, माझी आजी माझ्याकडे राहायला आली होती. आणि त्यावेळी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. मी आणि माझ्या कुटुंबाने हा चित्रपट पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. मात्र, त्यांना आधीच माहित होतं की, मी चित्रपटात हा सीन करणार आहे. मी चित्रपटाला हो म्हणण्यापूर्वी सगळं काही घरच्यांना सांगितलं होतं. कियाराने विकी कौशलसोबत 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटात काम केलं होतं.