मुंबई : अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) हे छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. राम त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतात. खरंतर, एकता कपूरच्या (Ekta Kapoor) 'बडे अच्छे लगते हैं' (Bade Acche Lagte Hain) मालिकेत त्यानं साक्षी तन्वरसोबत (Sakshi Tanwar) सुमारे 17 मिनिटे इंटीमेट सीन दिला होता. असा सीन टीव्हीच्या दुनियेवर पहिल्यांदाच चित्रित करण्यात आला आणि असे दृश्य पाहून प्रेक्षकांनी जोरदार विरोध केला. इतकंच नाही तर लोकांनी असंही म्हटलं की, संपूर्ण कुटुंब एकत्र बसून टीव्ही पाहतं आणि अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार छोट्या पडद्यावर दाखवू नये.
छोट्या पडद्यावर इंटीमेट सीन दाखवले जात नाहीत, मात्र, 'बडे अच्छे लगते है' मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यात इंटीमेट सीन दाखवण्यात आले होते. ऑनस्क्रीन किसिंग पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. राम-साक्षी यांच्यातील या 17 मिनिटांच्या लव्ह मेकिंग आणि किसिंग सीनमुळे शोनं एकीकडे टीआरपी रँकिंगमध्ये उडी घेतली होती. तर, दुसरीकडे त्यावर टीका करण्यात येत आहे. दोघांमधील लिपलॉक सीनमुळेही नवा वाद सुरू झाला.
राम कपूर आणि साक्षी यांच्यात दाखवण्यात आलेला हा बोल्ड सीन अजूनही सोशल मीडियावर व्हायर होताना दिसतो. या सीनबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात साक्षीनं मौन बाळगलं, नंतर जेव्हा जास्त विरोध सुरु झाला तेव्हा तिनं मत मांडलं आहे.
साक्षीनं म्हणाली, 'या सीनवर विनाकारण एवढा गोंधळ निर्माण केला जात आहे. हा सीन करण्यापूर्वी साक्षी तिच्या कुटुंबीयांशी चर्चा केली होती आणि घरच्यांनी तिला तसं करण्यास मनाई केली होती, परंतु तिला हे मान्य नव्हतं आणि तिनं हा सीन शूट केला.
हा इंटिमेट सीन व्हायरल झाल्यानंतर शोच्या निर्मात्या एकता कपूरची खिल्ली उडवण्यात आली. 'डर्टी पिक्चर' हिट झाला तर आता टीव्ही सीरियलमध्येही घाण पसरवतील, असे टोमणे देखील मारले आहेत. राम कपूर यांना घर एक मंदिर या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली होती पण ते प्रसिद्ध 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून मिळाली. त्यानंतर त्यांनी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले.
मालिकांमध्ये काम करत असताना रामला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. 'कुछ कुछ लोचा है', 'स्टुडंट ऑफ द इयर', 'एजंट विनोद', 'हमशकल्स', 'मान्सून वेडिंग', 'कार्तिक कॉलिंग कार्तिक', 'उडान', 'मेरे डॅड की मारुती', 'लव्ह यात्री', 'थप्पड' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.