Sara Ali Khan Rumoured Boyfriend : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच देव-धर्माचं करताना दिसते. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील तिनं तिनं केदारनाथचं दर्शन घेतलं आहे. नेहमी प्रमाणे यावेळी देखील तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. पण यावेळी सगळ्यात जास्त लक्ष कोणत्या गोष्टीनं वेधलं असेल तर ते आहे तिच्यासोबत असणाऱ्या मुलानं. तिच्यासोबत फोटोंमध्ये दिसणारा मुलगा हा साराचा कथित बॉयफ्रेंड आहे. याचं नाव अर्जुन प्रताप बाजवा आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की अखेर हा अर्जुन प्रताप बाजवा आहे तरी कोण? चला तर आज जाणून घेऊया की कोण आहे हा कथित बॉयफ्रेंड आणि नक्की काय करतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत सारा आणि अर्जुन हे दोघे शेजारी-शेजारी असून केदारनाथ मंदिराच्या मागे असलेल्या भीमशीला दगडाचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर नेटकरी हा अंदाज बांधत आहेत की दोघं एकत्र दिसत आहेत याचा अर्थ ते रिलेशनशिपमध्ये आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंना पाहता एक नेटकरी त्यावर कमेंट करत म्हणाला, 'अर्जुन एक पंजाबी राजकारण्याचा मुलगा असून तो एक चांगला मुलगा आहे. मी त्याला एका मित्रामुळे ओळखतो. तो खूप दयाळू आहे त्याशिवाय तो मुंबईमध्ये मॉडेलिंग करतो. त्याशिवाय तो खूप श्रीमंत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'चांगल वाटतंय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पण ते दोघं रिलेशनशिपमध्ये नाहीत. अर्जुन आणि मी एकाच फील्डमध्ये आहोत, त्यामुळे त्याची हमी देऊ शकतो. आणखी एक नेटकरी म्हणाला, तो खरंच खूप हॅन्डसम दिसतो.'
अर्जुन प्रताप बाजवा हा अनुभवी राजकारणी फतेह जंग सिंग बाजवा यांचा मुलगा आहे. ते सध्या पंजाबच्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. तर अर्जुन अभिनय क्षेत्रात त्याचं करिअर करण्यासाठी चंडीगढ आणि मुंबई असा प्रवास करताना दिसतो. अर्जुन फक्त अभिनेता नाही तर त्यासोबत सुपरमॉडेल देखील आहे. त्यानं अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींसाठी रॅम्प वॉक केलं आहे. तर ऑस्कर नॉमिनेटेड निर्देशक गिरीश मलिक यांच्या 'बॅन्ड ऑफ महाराजाज' मध्ये दिसले. त्यानं 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्लिंग'साठी प्रभु देवाची मदत केली होती.