Alia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी दिली.

Updated: Nov 7, 2022, 10:10 AM IST
Alia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय? title=
will alia bhatt quit bollywood post her daughters birth and follow kapoor familys tradition

Alia Bhatt Daughter : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी (Alia bhatt pregnancy) देत आपल्या या नात्यात चिमुकल्या पावलांची चाहूल लागल्याचं जाहीर केलं. महिने गेले, दिवस सरले आणि अखेर आलियाचं बाळ या जगात आलं. 6 नोव्हेंबर 2022 ला आलियानं गोंडस लेकिला जन्म दिला. (Alia bhatt daughter)

तिथे आलियाच्या लेकिच्या जन्मानंतर तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानंच या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. आलियाच्या लेकिचं मानापासून स्वागत केलं. या साऱ्यामध्ये कपूर आणि भट्ट कुटुंब पुढे होतं.

आलियाच्या लेकिचं नाव.... (Alia bhatt daughter name)

आलियाची लेक कशी दिसते इथपासून तिचं नाव काय असणार इथपर्यंतची उत्सुकता शिगेला पोहोचली. काही ठिकाणी करण्यात आलेल्या दाव्यांनुसार आलिया तिच्या मुलीचं माव आयरा ठेवणार असल्याचंही म्हटलं गेलं. इतकं सारं सुरु असतानाच काहींना मात्र भलतीच चिंता सतावताना दिसत आहे.

आलिया पुढे नेणार का कुटुंबाची परंपरा?

आलियानं लेकिला जन्म दिल्यानंतर चाहत्यांना सतावणारी चिंता म्हणजे लेक काहीशी मोठी झाल्यानंतर ही अभिनेत्री चित्रपट जगतात परतणार का? कपूर कुटुंबाची परंपरा आणि भूतकाळातील काही उदाहरणं पाहता येत्या काळात आलियाही बॉलिवूडपासून दूर राहू शकते असं काहींचं म्हणणं.

वाचा : Alia Bhatt Blessed With Baby :रणबीर-आलियाची लेक कोणासारखी दिसते? आजी नीतू सिंगने दिलं उत्तर

अभिनेता रणबीर कपूर याची आई (neetu kapoor) नीतू कपूर यांच्याबाबतीत जे झालं तेच आलियासोबतही होणार का, याचाच घोर अनेकांना लागला आहे. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नीतू जेव्हा ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या, तेव्हा कालांतराने कुटुंब त्यांच्या प्राधान्यस्थानी आलं.

कपूर कुटुंबात खरंच आहे का ही प्रथा?

आतापर्यंतच्या उदाहरणांना पाहिल्यास एक बाब लक्षात येते की, कपूर कुटुंबात महिलांनी चित्रपटांमध्ये काम करण्यावर फारशी सकारात्मक मतं नाहीत. (मुली याला अपवाद आहेत.) याबाब कधीच कुणी खुलेपणानं बोललं नाही. पण, लग्नानंतर कुटुंब प्राधान्यस्थानी असल्यामुळे बबिता, नीतू यांनाही या अलिखित प्रथा- परंपरेचं पालन करावं लागलं होतं. आता आलियानंही करिअरच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असताना लेकिला जन्म दिला. त्यामुळं तीसुद्धा कुटुंबालाच प्राधान्यस्थानी ठेवणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आलियाचे आगामी चित्रपट... (Alia bhatt upcoming movies)

फार कमी वयातच आलियानं तिच्या अभिनय कौशल्याच्या बळावर लोकप्रियता मिळवली. देशातील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. अशी ही आलिया येत्या काळात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'जी ले जरा' या चित्रपटांतून झळकणार आहे. राहता राहिला मुद्दा तिच्या भविष्यातील आणखी प्रोजेक्ट्सचा तर, तो येणारा काळच ठरवेल.