Blood Pressure : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवाचंय? 'या' पदार्थांपासून राहा 6 हात लांब

Blood Pressure : जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही दररोज किती मीठ वापरता यावर लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही काय मर्यादित प्रमाणात सेवन करावे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

Updated: Jun 26, 2023, 03:11 PM IST
Blood Pressure : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवाचंय? 'या' पदार्थांपासून राहा 6 हात लांब  title=

Blood Pressure : प्रत्येक व्यक्तीला डॉक्टरांचा एकच सल्ला असतो की ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी मीठ कमी प्रमाणात सेवन करावे. मीठ शरीरासाठी खूप महत्वपुर्ण आहे. मिठातील मिनरल फ्लूइड बॅलेंस आणि नर्व फंक्शनला नियमीत करतात.परंतु जास्त मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर सारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात ज्याला हायपरटेंशन देखील म्हणतात.

आरोग्य तज्ञांच्या मते, असे काही पदार्थ आहेत जे तुमच्या उच्च रक्तदाबाचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींना तुमच्या आहारापासून दूर ठेवा. चला जाणून घेऊया असे पदार्थ जे तुमचं ब्लड प्रेशर वाढवू शकतात

हिरव्या भाज्या 

खरंतर हिरव्या भाज्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, पण काही भाज्या अशा आहेत ज्यात पालक, गाजर, बीटरूट यासारख्या सोडियमचे प्रमाण जास्त असते, या भाज्यांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्यांनी या भाज्या खाऊ नयेत.

चीज 

चीजमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन जास्त असतात, परंतु चीजमध्ये सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचं अधिक प्रमाण असल्यामुळे जास्त प्रमाणात चीज खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते

पॅकेज सूप आणि पदार्थ

पॅक केलेले सूप जास्त काळ टिकण्यासाठी आणि त्यांची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये काही वेगळ्या पदार्थांचा समावेश असतो. म्हणून पॅकेज केलेल्या सूपऐवजी ताजे सूप प्या. चिप्स, नमकीन आणि बिस्किटे यासारख्या पॅकेज केलेल्या वस्तूंमध्ये मीठाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत या गोष्टींऐवजी ताजी फळे खाण्याचा प्रयत्न करा.

लोणचं आणि प्रक्रिया केलेले मांस 

लोणचे आणि इतर आंबट पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. त्याच वेळी, मांस बराच काळ चांगले ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मीठ देखील वापरले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी या गोष्टींपासून अंतर राखणे आवश्यक आहे.

ब्रेड आणि बेक्ड अन्न 

ब्रेड आणि बेक्ड पदार्थ बनवण्यासाठी मैदा आणि मीठ वापरले जाते. अशावेळी बाजारातील ब्रेड आणि बेक केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण तपासा आणि नंतर खा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)