गरोदर नसतानाही का मिस होतात पीरिड्स; यामागे असू शकतात 6 कारणे

Periods Late Reason : प्रत्येकवेळी मासिक पाळी न येण्यामागे गर्भधारणा राहिली हेतच कारण नसते. मात्र यामागची इतर कारणे देखील तितकेच जबाबदार. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 30, 2023, 03:23 PM IST
गरोदर नसतानाही का मिस होतात पीरिड्स; यामागे असू शकतात 6 कारणे  title=

Pregnancy Test Negative : महिलांच्या अनियमित पीरियड्सची समस्या ही अतिशय सामान्य बाब होत चालली आहे. ज्याचे मुख्य कारण शरीरातील हार्मोन्सचे असंतुल हे आहे. प्रत्येक महिलेची मासिक पाळी ही 22 ते 28 दिवसांची असते. वेळेत मासिक पाळी येणे ही एक उत्तम आरोग्याचे लक्षण देखील आहे. 

मात्र महिलेला एका महिन्यात मासिक पाळी वेळेत आली नाही तर त्याचे कारण गर्भधारणा असे होत नाही. त्याला इतर कारणे देखील असू शकतात. कारण काही महिलांची मासिक पाळी येत नाही पण प्रेग्नेन्सी टेस्ट केल्यावर मात्र ती निगेटिव्ह येते. अशावेळी त्या महिलेसमोर यक्ष प्रश्न उभा राहतो की, असे का घडले. 

Healthline च्या रिपोर्टनुसार, गर्भधारणा नसतानाही मासिक पाळी न येणे यामागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. कारण या सगळ्याचा आपल्या शरीरावर कळत नकळत विपरित परिणाम होत असतो. तज्ज्ञ सांगतात की, मासिक पाळी 2 ते 3 दिवस उशिरा येत असेल तर घाबरण्याच काही कारण नाही. काही महिलांच्या मासिक पाळी असे बदल होत असतात. पण जर तसे नसेल तर पुढील 6 कारणे समजून घेणे गरजेचे आहे. 

काही आजार 

जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा क्रोनिक आजार, ताप आणि इतर काही समस्या असल्याचं सांगण्यात येतं. यामुळे हार्मोन्स आणि मेंस्ट्रुअल सायकलवर प्रभाव पडतो. 

तणाव अधिक असणे 

ताण-तणावाचा परिणाम शरीरावर नकारात्मकपणे पडत असतो. मानसिक तणावाचा परिणाम शरीरावर कळत नकळत होत असतो. फक्त शरीरावरीलच ताणाचा परिणाम मासिक पाळीवर होतो असं नाही तर मानसिक आरोग्याचा परिणाम देखील होत असतो. कारण जर महिला अनेक दिवस तणावातून जात असेल तर अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो. 

पीसीओएस 

पीसीओएस आणि पीसीओडी सारख्या हार्मोन्स असंतुलनशी संबंधित असतात. याचा त्रास अनेक महिलांना होताना दिसत असतो. अशा महिलांनी औषधांसोबत निरोगी आहार आणि नियमित एक्सरसाइजला प्राधान्य द्यायला हवं. 

काही औषधे 

चिंता, ताण आणि तणावामुळे मासिक पाळीवर परिणाम होतो. या सगळ्यावर उपाय म्हणून काही औषधे घेतली जातात. काही जण ऍसिडिटीवर औषधे घेतात त्याचा देखील परिणाम मासिक पाळीवर होतो. 

वजन वाढणे 

वजन वाढल्यामुळे देखील मासिक पाळी पुढे जाते. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण वजन वाढल्यामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. आणि मासिक पाळी पुढे जाते. 

स्तनपान करणे 

ज्या हार्मोन्समुळे शरीरात दुधाची निर्मिती होते त्यामुळे देखील मासिक पाळी पुढे जातो. ओवुलेशन आणि पीरियड्स थांबले जातात. या दरम्यान तुम्हाला फक्त स्पॉटिंग दिसू शकते. जेव्हा तुम्ही स्तनपान करणं बंद करतात तेव्हा ही समस्या दूर होते.