मुंबई : दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने आता लोकांच्या मनात चिंता उपस्थित होऊ लागलीये. राजधानीत कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट 19.20% पर्यंत वाढला आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 917 नवीन रुग्ण आढळले. शिवाय संसर्गामुळे 3 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर एक्टिव्ह रुग्णांची संख्या 6867 झाली. तर गेल्या 24 तासांत 1566 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे.
9 ऑगस्ट रोजी इथला संसर्ग दर 17 टक्क्यांच्या वर गेला होता. त्यानंतर कोरोनाच्या डेटामध्ये पॉझिटीव्हिटी रेट 17.85 टक्के नोंदवला गेला. त्यानंतर गेल्या 12 दिवसांत संसर्गाचे प्रमाण तिप्पट झाले होते. यापूर्वी 28 जुलै रोजी दिल्लीत पॉझिटीव्हिटी रेट 6.56 टक्के होता.
दिल्ली हे देशातील सर्वाधिक संक्रमित राज्यांपैकी एक आहे. दिल्लीत सोमवारी 24 तासांत 1227 नवीन रुग्ण आढळले. सोमवारी दिल्लीत 8 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. तर 2130 लोक कोरोनापासून बरे झाले.
देशाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8,813 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान या कालावधीत 15,040 लोक बरे झाले आहेत. भारतात आता 1,11,252 एक्टिव्ह प्रकरणं आहेत. देशाचा दैनंदिन सकारात्मकता दर 4.15% आहे.
दिल्लीत कोरोनाचे 1227 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात 1189 रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, केरळमध्ये 758, कर्नाटकमध्ये 1206, तामिळनाडूमध्ये 703, आंध्र प्रदेशमध्ये 57, उत्तर प्रदेशमध्ये 671, पश्चिम बंगालमध्ये 270, ओडिशामध्ये 381, राजस्थानमध्ये 401, गुजरातमध्ये 290, छत्तीसगडमध्ये 48, 110 मध्य प्रदेशात 709, हरियाणामध्ये 105, तेलंगणात 265, पंजाबमध्ये 184, आसाममध्ये 42, जम्मू-काश्मीरमध्ये 273, उत्तराखंडमध्ये 68, झारखंडमध्ये 20, हिमाचलमध्ये 59, गोव्यात 52, मिझोराममध्ये 128, पुद्दुचेरीमध्ये 517, मणिपूरमध्ये 11, त्रिपुरामध्ये 6, छत्तीसगडमध्ये 55, मेघालयमध्ये 13, अरुणाचलमध्ये 2, सिक्कीममध्ये 14, नागालँडमध्ये 1 आणि लडाखमध्ये 8 नवीन रुग्ण आढळले आहेत.