जेवल्यानंतर फक्त 5 मिनिटं करा 'ही' गोष्ट, Diabetes राहिल नियंत्रणात!

Diabetes ला नियंत्रित करण्यासाठी एक साधं सोपं काम आहे ज्याने तुमचा Diabetes नियंत्रणात राहू शकतो.

Updated: Sep 2, 2022, 04:46 PM IST
जेवल्यानंतर फक्त 5 मिनिटं करा 'ही' गोष्ट, Diabetes राहिल नियंत्रणात! title=

Health News : घरातील प्रत्येक वयस्कर व्यक्तीला Diabetes आणि Blodd Pressure या आजारांनी घेरलं आहे. Diabetes ला नियंत्रित करण्यासाठी एक साधं सोपं काम आहे ज्याने तुमचा Diabetes नियंत्रणात राहू शकतो. जेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा Diabetes ची समस्या उद्भवते. 

इन्सुलिन हे समतोल राखण्यासाठी खूप मदत करते. इन्सुलिन हा स्वादुपिंडातून बाहेर पडणारा हार्मोन आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचं काम करतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की जेवणानंतर हलकं चालणं रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करू शकतं. 

जेवणानंतर थोडा वेळ चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, असं एका नवीन संशोधनातून समोर आलं आहे. स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात, संशोधकांनी बसण्याऐवजी उभं राहणं आणि चालणं यासारख्या हलक्या शारीरिक हालचालींचा इन्सुलिन आणि रक्तातील साखरेच्या पातळीसह हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? यावर सात वेगवेगळ्या अभ्यासांनी विश्लेषण केलं.

संशोधकांचं म्हणणं आहे की, दुपारचं किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेचच बसण्याऐवजी 5 मिनिटं हलकं चालणं रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात ठेवू शकतं. त्यासोबतही जेवण केल्यानंतर थोडावेळ उभं राहिलात तरीही रक्तातील साखरेची पातळीही कमी होऊ शकते. जर तुमचं काम पूर्ण दिवस बसूनच असेल तर प्रत्येक 20ते 30 मिनिटांनी उठून थोडं चालत रहा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्याचा अवलंब करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)