High Cholesterol Symptoms: बदलेल्या जीवनशैलीमुळे हाय कोलेस्ट्रॉलची (High cholesterol) समस्या हल्ली खूप सामन्य झालीये. हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अतिरिक्त कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी अजिबात चांगलं नाही. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनला गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) म्हणतात. हे कोलेस्ट्रॉल हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं. मात्र, अतिप्रमाण झाल्यास त्याचा तोटा तुमच्या शरिरावर दिसून येतो. (health tips 4 warning signs symptoms of high cholesterol fat in arteries know causes treatment options marathi news)
कोलेस्ट्रॉल मुख्यत्वे तळलेल्या, फास्ट फूड (fast food) आणि इतर काही पदार्थांमधून आपल्या शरीरात येते. त्याचा थेट परिणाम शरिरावर जाणवतो. काही संकेत आहेत, ज्यामधून दिसून येतं की, तुमच्या शरिरातील धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल हल्ला (cholesterol badhane ke lakshan) झालाय.
आणखी वाचा - Lower cholesterol : शरीरातील Cholesterol कमी करतील किचनमधील 'या' गोष्टी!
कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबीसारखा एक पदार्थ असतो जो आपल्या शरीरातील फॅट्स वाढवतो. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात गुड कोलेस्टेरॉल (Good Cholesterol) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात बॅड कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) असे कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत.