शरीराकडे लक्ष न दिल्यास अनेक प्रकारच्या शारिरीक समस्या समोर येतात. अशामध्ये शरीर आतून कमकुवत होतं आणि पोखरलं जातं. अनेकदा पुरुष आपल्या ऑफिसच्या कामात एवढे व्यस्त असतात ज्यामुळे ते आपल्या आहाराकडे पुरेस लक्ष देऊ शकत नाही. यामुळे शरीरातील अनेक समस्या डोकं वर करतात. शरीरात थकवा असण्याची अनेक कारणे असू शकतात. पोषकतत्त्वाची कमी, जास्त काम, चिंता आणि चुकीचा आहार यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. जास्त थकवा आल्यामुळे पुरुषांना दररोजची कामे होणे देखील अनेकदा कठिण होऊन जातं.
मात्र शरीरात थोडे सकारात्मक बदल करून आणि आयुर्वेदिक उपाय करुन चांगला फरक पाहायला मिळेल. पुरुषांचे शरीर अनेकदा आतून सुकून जाते याची भनक देखील त्यांना लागत नाही अशावेळी आयुर्वेदिक उपायांचा करावा वापर.
शरीरातील थकवा दूर करण्यासाठी पुरुषांनी आहाराची विशेष काळजी घ्यावी. सकस आहार घेतल्याने शरीरातील मरगळ आणि थकवा दूर होऊन शरीराला शक्ती मिळते. पुरुषांसाठी आहार निरोगी बनवण्यासाठी, कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा. कॅल्शियमसाठी दूध, दही आणि प्रथिनांसाठी डाळी, बीन्स आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.
अनेक वेळा पुरुष शारीरिक हालचालींकडे कमी लक्ष देतात, त्यामुळे शरीरात थकव्यासह स्नायू, सांधेदुखीची समस्या वाढते. अशा स्थितीत पुरुषांनी चालण्यासोबतच नियमित योगासने आणि प्राणायाम करावेत. असे केल्याने मनुष्य शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास आणि तणावमुक्त राहण्यास मदत करतो.
अश्वगंधा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अश्वगंधामध्ये कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी आढळते. याच्या सेवनाने शरीराला ताकद मिळते आणि शरीर तणावमुक्त राहण्यासही मदत होते. अश्वगंधा पावडरचे सेवन करण्यासाठी दुधात मिसळून प्या.
शिलाजीतमध्ये लोह, जस्त, कॅल्शियम आणि लोह आढळते. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो. शिलाजीतचे सेवन करण्यासाठी ते दुधात मिसळून प्यावे. याच्या सेवनाने निद्रानाशाच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी पुरुषांनी केवांचच्या बियांच्या पावडरचे सेवन करावे. केवांचच्या बियांमध्ये लोह, जस्त, तांबे, फायबर, पोटॅशियम आणि कॅल्शियम आढळतात, याच्या सेवनाने शरीरातील कमजोरी तर दूर होतेच पण शरीराला ऊर्जाही मिळते. याचे सेवन करण्यासाठी तुम्ही कोमट दुधात 1/4 चमचे केवांचच्या बियांची पावडर मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या. पुरुषांच्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा. मात्र, तुम्हाला कोणताही आजार किंवा ॲलर्जीची समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्यांचे सेवन करा.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)