Kitchen Hacks: पिकलेली केळी खराब होणार नाहीत, जाणून घ्या आठवडाभर ताजे ठेवण्याची युक्ती

केळी जास्त काळ ताजी (Fresh Banana) कशी ठेवावी? परंतु आता घाबरण्याची गरज नाही. केळी जास्त काळ ताजी कशी ठेवावी, जाणून घ्या ही सोपी ट्रिक. 

Updated: Jul 28, 2022, 10:43 AM IST
Kitchen Hacks: पिकलेली केळी खराब होणार नाहीत, जाणून घ्या आठवडाभर ताजे ठेवण्याची युक्ती title=

मुंबई : How to keep bananas fresh for longer : केळी जास्त काळ ताजी (Fresh Banana) कशी ठेवावी? जेव्हा केळी आपण बाजारातून विकत घेतो तेव्हा सर्वात मोठे टेन्शन असते की ते जास्त काळ ताजे कसे ठेवायचे, नाहीतर ती खराब होतील आणि खाण्यायोग्य राहणार नाहीत, परंतु आता घाबरण्याची गरज नाही. केळी जास्त काळ ताजी कशी ठेवावी, जाणून घ्या ही सोपी ट्रिक. 

आपल्यापैकी क्वचितच असा कोणी असेल ज्याच्या घरी केळी खाल्लेली नाही. अत्यंत स्वस्त आणि सामान्य फळ असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण ते खराब किंवा सडण्यापासून कसे वाचवायचे हा एक मोठा प्रश्न असतो. चला तर मग आम्ही तुम्हाला अशाच 5 ट्रिक सांगतो ज्यामुळे केळी जवळपास आठवडाभर ताजी राहतील.

केळी सडण्यापासून वाचवण्यासाठी बाजारातून हँगर्स विकत घ्या आणि त्यावर केळी त्याल लटकवून ठेवा. अशा प्रकारे ठेवल्याने तुम्ही केळी खूप दिवसांनी खाऊ शकता.

सामान्यतः आपण फ्रिजचा वापर खाद्यपदार्थ ताजे ठेवण्यासाठी करतो, परंतु केळीच्या बाबतीत असे अजिबात करु नका, तर केळी सामान्य खोलीच्या तापमानावर ठेवा.

त्वचेला वॅक्स करण्यासाठी आपण अनेकदा वॅक्स पेपर वापरतो, पण केळी ताजी ठेवण्यासाठीही आपण या पेपरचा वापर करु शकतो. यासाठी केळी गुंडाळून किंवा वॅक्स पेपरने झाकून ठेवा.

केळी जास्त काळ सडू नये म्हणून त्याच्या देठावर प्लॅस्टिक किंवा सेलो टेप गुंडाळा, यामुळे तुम्ही केळीला जास्त काळ ताजे ठेवू शकाल.

केळी ताजे ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी टॅब्लेट हा एक उत्कृष्ट आणि वैज्ञानिक मार्ग आहे. यासाठी गोळी पाण्यात मिसळा आणि नंतर त्यात केळी भिजवा.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याची ZEE 24 TAAS पुष्टी करत नाही.)