मुंबई : तुमचा रक्तगट हा आरोग्याबाबत अनेक संकेत देतो. तुमच्या साथीदाराच्या निवडीपासून ते अगदी स्वास्थ्य सुधारण्यासाठी आवश्यक डाएटसाठी तुमचा रक्तगट महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
आजकाल आबालवृद्धांमध्ये हृद्यविकाराचा धोका वाढत आहे. व्यस्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताणतणाव यामुळे कार्डिएक अरेस्ट सारख्या समस्या वाढल्या आहेत. पण तुम्हांला ठाऊक आहे का ? काही रक्तगटाच्या लोकांना हृद्यविकाराचा धोका कमी असतो. वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ब्लड डाएट
अमेरिकेतील हार्ट इंस्टिट्युटच्या एक्सपर्ट सल्ल्यानुसार, o रक्तगटाच्या रूग्णांना हदय विकाराचा धोका कमी असतो. वायुप्रदुषणामुळे A, B, AB च्या तुलनेत O रक्तगटाच्या रूग्णांना हृद्यविकारांचा धोका कमी असतो. जेव्हा प्रदूषणाची पातळी 25 मायक्रोग्राम / घनमीटरपेक्षा अधिक असते तेव्हा O रक्तगटाच्या रूग्णांच्या तुलनेत इतरांसाठी हृद्यविकाराच्या धोक्याचा त्रास अधिक असण्याची शक्यता असते.
संशोधकांनी वायुप्रदुषण आणि हार्ट अटॅक यांचा संबंध लावण्यासाठी चारही रक्तगटाच्या रूग्णांवर अभ्यास केला. संशोधकांच्या दाव्यानुसार, चारही रक्तगटाच्या अनुवंशिक अंतराचा अभ्यास केला. त्यामध्ये पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह अशा दोन्ही स्वरूपाच्या रक्तगटाच्या रुग्णांचा समावेश करण्यात आला होता.
संशोधकांच्या दाव्यानुसार, हार्ट अटॅक आणि वायुप्रदूषणाचा धोका O रक्तगटाच्या रूग्णांपेक्षा इतरांना अधिक असला तरीही त्यांनी त्याची चिंता करत बसण्यापेक्षा केवळ त्यांच्या आरोग्याबाबत इतरांच्या तुलनेत थोडं अधिक दक्ष राहणं गरजेचे आहे. या चहाने दिवसाची सुरूवात केल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
वायुप्रदूषणामुळे हृद्यविकाराचा धोका o रक्तगटाच्या रूग्णांना कमी असला तरीही प्रमाणापेक्षा वायुप्रदूषणाची पातळी वाढल्यास O रक्तगटाच्या रूग्णांना हार्ट अटॅक, छातीत वेदना जाणवणं हा त्रास बळावतो. हा रिपोर्ट कॅलिफॉर्नियातील अमेरिकन हार्ट असोसिएशन सायंटिफिक सेशनच्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित आहार, व्यायाम यांच्या मदतीने तुम्ही आरोग्याबाबत सतर्क रहा. म्हणजे त्रास गंभीर स्वरूपात होण्याचा धोका कमी होईल.