Skin Care Tips : हिवाळा सुरु झाला आहे. त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. पण अनेकदा त्वचेची काळजी (Skin Care) घेऊनही त्वचे संबंधित समस्या सुरु होतात. त्याच मुख्य कारण असं आहे की आपण कोणतीही गोष्ट पूर्ण करत नाहीत. बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम्स (Cremes), लोशन (Lotion) आणि फेस वॉशच्या (Facewash) मदतीने आपण आपला चेहरा स्वच्छ आणि मॉइश्चरायझ (Moisturize) ठेवतो जेणेकरून आपला चेहरा तजेलदार आणि चमकदार राहतो. (skin care tips difference between sunscreen and moisturizer know in one click nz)
अनेकदा तुम्ही मेकअपशी (Makeup) संबंधित व्हिडिओ पाहिले असतील किंवा कुठूनतरी ऐकले असेल की आपण सनस्क्रीन (Sunscreen) वापरावे किंवा आपल्या कोरड्या त्वचेवर मॉइश्चरायझर (Moisturizer) लावावे. दोन्ही क्रीमसारखे आहेत पण त्यांच्यात फरक आहे. आज आम्ही तुम्हाला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरमध्ये काय फरक आहे हे सांगणार आहोत.
आपल्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर वापरतो. हिवाळ्यात आपण मॉइश्चरायझरचा सर्वाधिक वापर करतो. कारण या दिवसात आपली त्वचा सर्वात जास्त कोरडी होते.
आजकाल अनेक प्रकारचे मॉइश्चरायझर बाजारात आले आहेत, जे तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडू शकता. हे सहसा रात्री झोपण्यापूर्वी आणि आंघोळ केल्यानंतर वापरले जाते. सनस्क्रीन लावण्यापूर्वी मॉइश्चरायझरचा वापर केला जातो.
सनस्क्रीन ही अशी क्रीम आहे जी आपण टॅनिंग आणि सूर्यापासून हानिकारक किरण टाळण्यासाठी लावतो. आपल्या शरीराचे जे भाग सूर्यप्रकाशामुळे प्रथम टॅन होतात त्या भागांवर आपण सनस्क्रीनचा वापर करतो. जसे की चेहरा, हात, मान आणि पाठ. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावले जाते आणि मग त्यावर सनस्क्रीन लावले जाते. सनस्क्रीनला सनब्लॉक, सनबर्न क्रीम आणि सनटॅन लोशन असेही म्हणतात.
या दोन्ही क्रीमना स्वत:चे महत्त्व आहे. एक क्रीम आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि दुसरे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. जर तुमची त्वचा कोरडी नसेल तर तुमच्यासाठी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. पण जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दोन्ही वापरावे. बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका. आपण उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली आहे. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)