GK : 'बीड'चे जुने नाव माहित आहे का? 12 वेशी असलेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा

बीड जिल्ह्याचे जुने नाव माहित आहे का? जाणून घेऊया बीड जिल्ह्याचा इतिहास.

वनिता कांबळे | Updated: Jan 31, 2025, 03:10 PM IST
GK : 'बीड'चे जुने नाव माहित आहे का? 12 वेशी असलेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा title=

Beed District Old Name : विविध कारणांमुळे महाराष्ट्रातील बीड जिल्हा नेहमीच चर्तेत असतो. बीड जिल्हा पूर्वी हैद्राबाद राज्याचा भाग होता. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. बीड हा 12 वेशी असलेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा आहे. तुम्हाला 'बीड'चे जुने नाव माहित आहे का? जाणून घेऊया बीड जिल्ह्याचा रंजक इतिहास.

ऊसतोड कामगारांचा जिल्ह अशी देखील बीडची ओळख आहे. बीड जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट यांचा संबंध बीड जिल्ह्याशी असल्याचे बोलले जाते. रामायणात लंकाधीश रावण व जटायू (रामायण) चं युद्ध येथेच झाल्याची देखील अख्यायिका आहे. बीड शहरातील पेठबीड भागात जटायू मंदिर आजही अस्तित्वात आहे. पेशवाईच्या काळी पानिपत झालेल्या मराठी सत्तेला गतवैभव इथेच प्राप्त झाले.  निजामशाहीला परभूत करुन मराठ्यांनी आपले साम्राज्य परत मिळवले. 

हे देखील वाचा... GK : 'भोसरी'चे जुने नाव माहित आहे का? महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त चर्तेत असणारे गाव

बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले आहे. यामुळेच  'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे असे सांगितले जाते. पांडवकाळात बीड जिल्ह्याचे नाव 'दुर्गावतीनगर' असे होते. यानंतर चालुक्यकाळात चंपावतीराणीच्या नावावरून  बीड हे 'चंपावतीनगर' या नावाने ओळखले जायचे. राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी पहायला मिळते.

प्राचीन आणि सांस्कृतिक अशी देखील बीड जिल्ह्याची ओळख आहे. बीड शहरात एकूण 12 वेशी होत्या. प्रत्येक वेशीला एक वेगळी ओळख आहे.  6 वेशी नामशेष झाल्या आणि आता 6 वेशी शिल्लक आहेत. राजुरी वेस, कागदी वेस, हिरालाल वेस, वतार वेस, नदीच्या काठची वेस, काळा हनुमान ठाणा यांच्या खाणाखुणा पहायला मिळतात. धर्मापुरीचा प्राचीन किल्ला, प्रभू वैजनाथाचे परळी येथील मंदिर, अंबाजोगाई ही बीडमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत.