Iqbal Murder Case: पतीला झोपवलं त्यानंतर शेजाऱ्याच्या घरी गेली, किस घेतल्यानंतर गळा दाबून त्याला संपवलं... हा सारा प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये घडली. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आरोपी महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या इक्बाल नावाच्या व्यक्तीची हत्या केली. हत्या केल्यानंतर ही विवाहित महिला दबक्या पावलांनी आपल्या घरी आली आणि झोपली. आपण काही केलं नाही आणि पाहिलंही नाही असं तिचं वागणं होतं. दुसऱ्या दिवशी इक्बालचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. आधी या आरोपी महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर या महिलेला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने गुन्हा कबुल केला.
हा सारा प्रकार, बरेलीमधील भोजीपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. येथील रुबीना नावाच्या महिलेने आपल्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर पती झोपी गेल्यावर ती शेजारी राहणाऱ्या इक्बालच्या घरी गेली. त्यावेळी इक्बालने रुबीनावर शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. तो रुबीनाच्या जवळ आला. तिने त्याला किस केलं आणि त्याचा गळा दाबला. हत्या केल्यानंतर रुबीना मृतदेह पायऱ्यांवरच सोडून घरी निघून गेली.
रुबीनाने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये आपण इक्बालच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलो होतो असं सांगितलं. इक्बाल रुबीनाला ब्लॅकमेल करुन शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. रुबानाने दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल भांड्यांना कलई लावण्याचं काम करायचा. अनेकदा इक्बाल त्याच्या गावी ये-जा करायचा. रुबीना आणि इक्बाल यांची याचदरम्यान भेट झाली. त्यांनी एकमेकांच्या फोन नंबरची देवाण-घेवाण केली. ते फोनवर बोलू लागले. नंतर इक्बालने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा दावा रुबीनाने केला आहे. मी इक्बालला पतीला सगळं सांगेन असं म्हटलं तेव्हा त्याने सर्व कॉल रेकॉर्डींग माझ्याकडे असून मी तुझा संसार उद्धवस्त करुन टाकेन अशी धमकी दिल्याचं रुबीनाने पोलिसांना सांगितलं आहे.
मला लहान मुलं असल्याने मी हे सारं सहन केलं असंही रुबीनाने इक्बालच्या छळाबद्दल पोलिसांना माहिती देताना सांगितलं. अनेकदा शरीरसंबंध ठेवण्यासाठी इक्बालने मला ब्लॅकमेल केलं. मी या सततच्या त्रासाला कंटाळले होते. मी त्यावेळी इक्बालला संपवण्याचं किंवा आत्महत्या करण्याचं ठरवलं होतं, असं रुबीना म्हणाली. बुधवारी इक्बाल त्याच्या पत्नीला तिच्या माहेरी सोडून आला. त्यानंतर रुबीनाने त्याला भेटण्यासंदर्भात विचारलं असता इक्बालने लगेच होकार दिला.
35 वर्षीय रुबीनाने इक्बालकडे जाण्याआधी आपल्या पतीला झोपेची गोळी दिली होती. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास ती इक्बालच्या घरी पोहोचले. इक्बाल तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करत असताना तिने जवळ जात त्याच्या गालावर चुंबन घेतलं. एक हात त्याच्या तोंडावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्याचा गळा दाबला. 29 जानेवारी झालेल्या या हत्येचा आता खुलासा झाला आहे. इक्बालच्या शवविच्छेदन अहवालामधूनही त्याचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याचं समोर आलं आहे.