विराट कोहलीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, इंग्लंड विरुद्ध दुसरा सामना खेळणार की नाही?

Virat Kohli Fitness Update : सध्या वाईट फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीला इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या सीरिजमध्ये कमबॅक करण्याची चांगली संधी आहे. तेव्हा 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात विराट खेळणार की नाही याबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत. 

पुजा पवार | Updated: Feb 7, 2025, 02:19 PM IST
विराट कोहलीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, इंग्लंड विरुद्ध दुसरा सामना खेळणार की नाही? title=
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) वनडे सीरिजच्या पहिल्या सामन्याला मुकला. गुडघ्याला सूज झाल्याने नागपूर येथे झालेल्या पहिल्या वनडेत तो खेळू शकला नाही त्यामुळे श्रेयस अय्यरला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. श्रेयसने इंग्लंड विरुद्ध अर्धशतकीय खेळी केली असली तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर विराट अनफिट असणं टीम इंडियाला परवडणारं नाही. सध्या वाईट फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीला इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या सीरिजमध्ये कमबॅक करण्याची चांगली संधी आहे. तेव्हा 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात विराट खेळणार की नाही याबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत. 

शुभमन गिलने विराटच्या फिटनेसबाबत दिली माहिती : 

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या सामन्यानंतर उपकर्णधार शुभमन गिल हा ब्रॉडकास्टर्स सोबत बातचीत करत होता. तेव्हा गिलने सांगितले की, विराट कोहलीच्या गुडघ्याला सूज आली होती. तो आदल्या दिवशी सराव करताना पूर्णपणे फिट होता. गिल पुढे म्हणाला की, "जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा कळाले की विराटच्या गुडघ्यांना हलकी सूज आली आहे. तो काल पर्यंत बिलकुल फिट होता. तो पुढील सामान्यापर्यंत एकदम फिट होईल". विराट कोहलीच्या कारकिर्दीतील काही सामन्यांपैकी हा एक सामना आहे ज्यात विराटला दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले होते. नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने (Team India) इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव करून विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-0  ने आघाडी घेतली. आता भारताचा दुसरा वनडे सामना हा 9 फेब्रुवारी ओडिशा येथील स्टेडियमवर होणार आहे. 

हेही वाचा : ODI सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतल्यानंतरही 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया असेल चिंतेत

 

दोघांचे पदार्पण : 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी पदार्पण केले. जयस्वालला कर्णधार रोहित शर्माने वनडे कॅप दिली तर मोहम्मद शमीने स्वतःच्या हातांनी हर्षित राणाला एकदिवसीय कॅप दिली.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने शानदार गोलंदाजी केली आणि 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात हर्षित राणाने डकेट, हॅरी ब्रुक आणि लिव्हिंगस्टोनच्या विकेट घेतल्या.

टीम इंडिया प्लेईंग 11:  

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी