AIDS बाधित तरुणाने 6 जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून...; गुजरातमध्ये हादरवणारा प्रकार

AIDS Infected Youth Lured Girls Into Love Trap: पोलिसांनी एका प्रकरणामध्ये या आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा समोर आला

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 7, 2025, 02:17 PM IST
AIDS बाधित तरुणाने 6 जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून...; गुजरातमध्ये हादरवणारा प्रकार title=
गुजरातमधील धक्कादायक प्रकार (प्रातिनिधिक फोटो, उजवीकडील फोटो AI जनेरेटेड)

AIDS Infected Youth Lured Girls Into Love Trap: गुजरातमधील अहमदाबादमधील गुन्हे शाखेच्या मानव तस्करीविरोधी पथकाने एका एड्सबाधित तरुणाला अटक केली आहे. आपल्याला हा दुर्धर रोग असल्याचं ठाऊक असतानाही या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि 10 महिन्यांपूर्वी तो तिच्याबरोबर फरार झाला. गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील 10 वर्षांपासून एड्सबाधित आहे. मात्र त्यानंतरही मागील 12 वर्षांपासून या तरुणाने 6 वेगवेगळ्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं शोषण केलं. 

..अन् मुलगी झाली बेपत्ता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असारवा येथे 22 मार्च 2024 रोजी आपल्या कुटुंबाबरोबर एका सामाजिक कार्यक्रमासाठी गेलेली ही अल्पवयीन मुलगी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक गायब झाली. या मुलीच्या वडिलांनी शाहीनबाग पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तीन महिन्यापासून या मुलीचा शोध घेतल्यानंतरही तिचा शोध न लागल्याने एफ विभाग पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं. यादरम्यान या अल्पवयीन मुलीने उच्च न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली.

कुठे सापडली मुलगी?

तपास करणाऱ्या पोलिसांना अखेर ही बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी मध्य प्रदेशमधील अनुपपूर जिल्ह्यातील कोतमा येथे सापडली. अल्पवयीन मुलीला घेऊन फार झालेल्या तरुणाला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या मानव तस्करीविरोधी विभागाने अटक केली. आरोपीच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील 10 वर्षांपासून एड्सबाधित आहे. आरोपीने मागील 12 वर्षांमध्ये वेगवेगळ्या वेळात 6 हून अधिक तरुणांना प्रेमात अडकवून त्यांचं शोषण केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणीच आरोपीही व्यवसाय करतो.

संशय येऊ नये म्हणून...

कुटुंबाबरोबर जवळीक वाढवून आरोपी या मुलीच्या कौटुंबिक कार्यक्रमांबरोबरच घरी सुद्धा येऊ जाऊ लागला. त्यानंतर ही अल्पवयीन तरुणी मुलाच्या प्रेमात पडली. या तरुणीने तिच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 22 मार्च 2024 रोजी अल्पवयीन मुलगी अहमदाबादमधील असारवा येथील एका कार्यक्रमासाठी गेली होती. त्यावेळेस आरोपीने तिला पळवून नेत बजेरा येथील आपल्या भाड्याच्या घरी या मुलीला घेऊन गेला आणि तिथेच तिला लपवून ठेवलं. या साऱ्या फसवणुकीमध्ये आरोपीचा भाऊ आणि आई सुद्धा सहभागी होती. अल्पवयीन तरुणीला ज्या घरात ठेवण्यात आलेले तिथे तिचा हा कथित प्रियकरच तिला जेवण आणून घ्यायचा. या घरात कोणी राहतं अशी शंका येऊ नये म्हणून दाराला बाहेरुन कडी लावली जायची. 

वकिलाच्या सल्ल्याने केलं कृत्य

आरोपीला त्याच्या वकिलानेच सल्ला दिलेली का मुलगी अल्पवयीन असल्याने ती सज्ञान होईपर्यंत तिला कुठेतरी घेऊन पळून जा. वकिलाच्या सल्ल्यानुसार आरोपी या मुलीला घेऊन सूरत, औरंगाबाद, बीड, हैदराबाद, नागपूरमार्गे छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये घेऊन गेला. आरोपी त्याच्या चुलत्याच्या अंबिकापूरमधील घरी वास्तव्यास होता. त्यानंतर तो कोतमा येथील आत्येभावाने घेऊन दिलेल्या भाड्याच्या घरात तो या मुलीसोबत राहत होता. तिथूनच त्याला अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.