'39 लाख मतं महाराष्ट्रातून बिहारमध्ये जातील, मग यूपीला...' संजय राऊतांनी सर्वच सांगितलं...

Sanjay Raut On Maharashtra Voting: आम्हाला कशाप्रकारे हरवण्यात आलं? हे साऱ्यांनी पाहिल्याचे संजय राऊत म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 7, 2025, 01:21 PM IST
'39 लाख मतं महाराष्ट्रातून बिहारमध्ये जातील, मग यूपीला...' संजय राऊतांनी सर्वच सांगितलं... title=
संजय राऊत

Sanjay Raut On Maharashtra Voting: महाराष्ट्रात 5 वर्षांत 34 लाख नवीन मतदार जोडले गेले होते पण लोकसभा निवडणुका झाल्या आणि 5 महिन्यातच अचानक 39 लाख नवीन मतदारजोडले गेले ते कसं, कोण आहेत ते? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय. 39.5 कोटी लोकसंख्या सरकारची आकडेवारी निवडणूक आयोगाला वाटते त्यापेक्षा अधिक असल्याचे ते यावेळी म्हणाले. राहुल गांधी,खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

संजय राऊतांची टिका 

39 लाख मतं कुठून आले? आता ही मतं बिहारमध्ये जातील. मग उत्तर प्रदेशमध्ये जातील. ही मत फिरत असतात. त्यामुळे हे निवडणुका जिंकतात. लोकांमध्ये जागृती यायला हवी. आम्हाला कशाप्रकारे हरवण्यात आलं? हे साऱ्यांनी पाहिल्याचे संजय राऊत म्हणाले. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

धैर्यशील मोहिते म्हाडा मतदारसंघातून निवडून आले. अनेक उमेदवारांनी फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी केली जातेय. आमची पार्टी तोडली, त्याची लढाई आजही सुरु आहे. साताऱ्यातील निवडणूक तुतारी आणि ट्रम्पेटमुळे हरलो. आमच्या 11 जागा गोंधळात आहेत. तरीही त्यांनी तुतारी तीच ठेवली. हे निवडणूक आयोगाला आम्ही सविस्तर सांगितलं. सत्ताधाऱ्यांनीही हे मान्य केले. सशक्त लोकशाही ठेवायची आहे. कोण हरलं-जिकंल हे महत्वाचं नाही. पण लोकशाही सशक्त असली पाहीजे. संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे. पारदर्शकता यायला हवी, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'आमचे मतदार कमी झाले नाहीत, भाजपचे वाढले'

आमचे मतदार कमी झाले नाहीत, भाजपचे वाढले आहेत असं म्हणत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आम्ही आरोप करत नाही ही बाब स्पष्ट केली. 'फक्त लोकसभा निवडणुकीतील मतदार यादी आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी आम्हाला द्या. त्यात नाव आणि तपशील असावेत. जे तुम्ही देत नाही. निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ती यादी द्यावी. आम्हाला हा मुद्दा शेवटपर्यंत न्यायचा आहे', अशी ठाम भूमिका त्यांनी इंडिया आघाडीच्या वतीनं मांडली.