ODI सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतल्यानंतरही 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया असेल चिंतेत

 टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने संघाला हताश केलं तर काही वेळा संघ बॅकफूटवर दिसला.

पुजा पवार | Updated: Feb 7, 2025, 12:22 PM IST
ODI सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतल्यानंतरही 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया असेल चिंतेत title=
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात गुरुवार 6 फेब्रुवारी रोजी तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधला पहिला सामना पार पडला. नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने (Team India) इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव करून विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 1-0  ने आघाडी घेतली. टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने संघाला हताश केलं तर काही वेळा संघ बॅकफूटवर दिसला. आता भारताचा दुसरा वनडे सामना हा 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाला आपल्या चुकांमधून अनेक गोष्टी शिकाव्या लागतील. तेव्हा अशा 3 कारणांबद्दल जाणून घेऊयात ज्यामुळे टीम इंडियाने सामना जिंकूनही हेड कोच गौतम गंभीर टेन्शनमध्ये असेल. 

रोहित शर्माचा फॉर्म : 

भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मागील काही सामान्यांपासून रोहित शर्मा फलंदाजीत समाधानकारक धावा बनवू शकला नाही, आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधाराचा असा फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. सलामी फलंदाज म्हणून उतरलेल्या रोहितने गुरुवारी इंग्लंडच्या 7 बॉलचा सामना करून 2 धावा केल्या. मागील 16 इनिंग्समध्ये रोहित फक्त 166 धावा करू शकला आहे. 

विराट कोहलीची दुखापत : 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या दुखापतीने त्रस्त आहे. नाणेफेकीदरम्यान रोहित शर्माने सांगितले की काल रात्री विराटच्या उजव्या गुडघ्यात वेदना होत असल्याने तो इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे विराटच्या ऐवजी श्रेयस अय्यरला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली. सामन्यापूर्वीही तो मैदानावर गुडघ्याला पट्टी बांधून वॉर्म अप करताना दिसला होता. विराटची ही दुखापत किती गंभीर आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विराट हा 2023 मध्ये झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराटची हे दुखापत गौतम गंभीर आणि टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होऊ शकते. 

हेही वाचा : 'पंबाज आता माझी टीम असून संघमालकांना...'; पाँटींगने IPL 2025 आधी स्पष्टच सांगितलं

 

जसप्रीत बुमराह : 

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीचा फटका भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही बसला. मागच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात बुमराहला गोलंदाजी करता न आल्याने भारताला सामना गमवावा लागला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया फिट आहे कि नाही यासाठी संघाला रिपोर्टची वाट पाहावी लागेल. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित आगरकरने सांगितले की बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतील ग्रुप सामन्यांना मुकू शकतो. त्यामुळे ही देखील टीम इंडियासाठी चिंतेचीबाब आहे.