Mamta Kurlkarni on Salman Khan And Srk: ममता कुलकर्णीने 1995 च्या 'करण अर्जुन' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. तिने सांगितले की, 'चित्रपटाचे कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश होते. त्यांच्या सहाय्यकाने सांगितले की मास्टरने बोलावले आहे. मी पायऱ्या चढत असताना सलमान आणि शाहरुख माझ्या जवळून गेले. रात्रीचे 8 वाजले असतील. मी मास्टरजींकडे गेले. त्याने मला सांगितले की तू काही डांस स्टेप्स तू एकट्याने करशील. दुसऱ्या दिवशी माझा पहिला शॉटचे शूटींग झाले आणि त्या शॉटला मंजूरीही मिळाली.'
ममता पुढे म्हणाली, 'शाहरुख आणि सलमान दोघे तिच्यावर गुपचूप लक्ष ठेवून होते. पुढचा शॉट त्यांचा होता. त्यांना गुडघ्यावर बसून डान्स करायचा होता. तिथे 5000 लोक होते. सलमान आणि शाहरुखच्या डान्स शॉटच्या वेळी अनेक रिटेक घेण्यात आले. पणते चुकत असल्याने दिग्दर्शक त्या दोघांवर ओरडले, त्यामुळे आम्ही सर्वजण आपल्या खोलीत धावलो, पण मी खोलीत जात असताना सलमान खानने मला थांबवले आणि माझ्या तोंडावर दार लावले.'
सलमान खानचे खोडकर स्वभाव:
ममता कुलकर्णी म्हणाली की, सलमान खान एक खूप खोडकर व्यक्ती आहे आणि तो नेहमीच तिला चिडवायचा. पण ममता त्याच्यावर शांतपणे प्रतिक्रिया देत होती आणि ती त्याला सांगायची, 'सलमान गप्प बस.' ममता नेहमीच कोणत्याही प्रकारच्या गैरसमजापासून दूर राहिली.
हे ही वाचा: गरिबीतून सुपरस्टार होण्यापर्यंतचा संघर्ष आणि बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रशी लग्न, फोटोमधील अभिनेता कोण?
ममता कुलकर्णीचे पुढील प्रवास:
ममता कुलकर्णीच्या या खुलाशांनी अनेकांची उत्सुकता वाढवली आहे. ती चित्रपटसृष्टीपासून बऱ्याच काळापासून दूर आहे, पण या नव्या खुलाशाने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ममता यापूर्वी 'आशिक आवारा', 'बाजिगर', 'करण अर्जुन' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केली आहे. तिच्या वागणुकीमुळे आणि अभिनय शैलीमुळे ती एका काळात लक्ष वेधून घेत होती. आता बॉलिवूडची हीचं अभिनेत्री 24 जानेवारी रोजी महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून नियुक्तीही करण्यात आली होती. पण काही कारणास्तव तिला त्यातून काढण्यात आले.