Govinda's Wife Sunita Ahuja : 90 च्या दशकात सगळ्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचं नाव आहे. गोविंदाचे चित्रपट हे हिट होणारचं असं म्हटलं जायचं. मात्र, अभिनय क्षेत्रापासून स्वत: ला लांब केल्यानंतर त्यानं राजकारणात नशिब आजमावलं. त्यानंतर जेव्हा गोविंदानं पुन्हा त्याचं नशिब अभिनय क्षेत्रात आजमावलं पण त्याला काही काम मिळालं नाही. काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती त्यानंतर त्याच्या घराच्या बाल्कनीमध्ये मीठ, लिंबू आणि कापूर सारख्या गोष्टी ठेवल्या आहेत. या सगळ्या काळ्या जादूमागचं सत्य गोविंदाची पत्नी सुनीता अहूजानं स्वत: सांगितलं आहे.
खरंतर, गोविंदाची आई ही देवीची मोठी भक्त आहे. हेच कारण आहे की स्वत: गोविंदा देखील देवीवर विश्वास ठेवतो आणि तिचा भक्त आहे. गोविंदाची पत्नी सुनीता कपूरनं मुंबईत राहत असलेल्या बंगल्याच्या टूरचा एक व्हिडीओ चॅनलवर शेअर केला आहे. या टूरमध्ये सुनीता अहूजानं घराची बाल्कनी देखील दाखवली. तिथे मीठ, लिंबू, कापूर आणि तुरटी सारख्या गोष्टी सतत ठेवलेल्या असतात.
सुनीता या व्हिडीओत सांगताना दिसते की 'मी तुम्हाला माझी बाल्कनी दाखवते. इथे माझं आणि टीनाचं तुळशीचं झाड आहे. आम्ही रोज संध्याकाळी राईच्या तेलाचा दिवा लावतो. जेणेकरूण कोणतीही वाईट नजरे माझ्या घराला किंवा माझ्या मुलांना लागणार नाही. ही बाल्कनी आम्ही फक्त तुळशी मातेसाठी बनवली आहे. त्यामुळे घरात कोणती पार्टी होत असेल किंवा कोणी स्मोकिंग करत असेल तेव्हा आम्ही ही बाल्कनी बंद करतो. माझ्या घरातील ही बाल्कनी फक्त देवाच्या पुजेसाठी ठेवली आहे. मी रोज सकाळी सूर्य देवाला इथे पाणी अर्पण करते. तुम्ही हे सांगू शकतात की माझं हे आउटडोर पूजा घर आहे. नजर लागू नये यासाठी आम्ही लोकं बाल्कनीमध्ये या सगळ्या गोष्टी ठेवतो. त्यानंतर सुनीतानं दाखवलं की तिच्या बाल्कनीमध्ये धूप, एक ग्लास लिंबू आणि कापूर सारख्या गोष्टी दिसत आहेत.'
हेही वाचा : रिक्षा चालकासमोर आमिर खानला ओळखण्यास लेक जुनैदनं दिला नकार; स्वत: सांगितला मजेदार किस्सा
सुनीता अहुजानं स्वत: सांगितलं की 'त्यांचं हे संपूर्ण घर वास्तुच्या हिशोबानं बनवण्यात आलं आहे. ते म्हणाले की घराच्या या भागात वास्तू नुसार इथे आरसा लावण्यास सांगितलं होतं, तिथेच तिनं आरसा लावला आहे. नॉर्थ ईस्टमध्ये घरात हत्तीची छोटीशी प्रतिमा ठेवली आहे आणि ती देखील वास्तूच्या हिशोबानं आहे.'