Dwadash Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात अनेक ग्रह आणि नक्षत्र स्थिती बदल करत असतात. फेब्रुवारी नऊ ग्रहांपैकी सर्वात शक्तिशाली आणि कर्माचा दाता शनिदेव आणि वाणी, बुद्धीचा कारक बुधदेव आपली स्थिती बदलणार आहे. या दोन शक्तिशाली ग्रहांचा संयोगातून एक अतिशय शुभ असा राजयोग निर्माण होतोय. त्याचप्रमाणे, शनीच्या हालचालीतील बदलामुळे, तो बुधापासून 30 अंशांच्या अंतरावर राहणार आहे. ज्यामुळे द्विदशा योग निर्माण होतोय. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह कुंडलीत एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या घरात असतात किंवा एकमेकांपासून 30 अंशांच्या अंतरावर असतात, तेव्हा द्विदशा योग निर्माण होतो. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना भरपूर फायदे होणार असून त्यांचा सुवर्ण काळ सुरु होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि आणि बुध हे एकमेकांचे मित्र मानले गेले आहेत. शनि कुंभ राशीत असून बुध मकर राशीत आहे. 8 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:25 वाजता शनि आणि बुध एकमेकांपासून 30 अंशांवर असणार आहे.
या राशीत, शनि दहाव्या घरात आणि बुध नवव्या घरात आहे. यामुळे या राशीच्या लोकांसाठी द्विदशा योग खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच आनंद नांदणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामांच्या पूर्ण होणार असल्यासोबत संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. अचानक आर्थिक लाभासोबतच मालमत्ता, घर आणि वाहनातूनही आनंद मिळणार आहे. नोकरीबाबत तुम्ही काही महत्त्वाचा निर्णय घेणार आहात. ज्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात खूप चांगले दिसणार आहे. उत्पन्नात मोठा फायदा पाहिला मिळणार आहे. यासोबतच तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहात. आरोग्य चांगले राहणार आहे. पालक त्यांच्या मुलांचे यश पाहून खूप आनंदी असेल.
या राशीच्या लोकांसाठी द्विदाश राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश प्राप्त करणार आहे. यासोबतच, समाजात आणि कामाच्या ठिकाणी आदर आणि सन्मानात झपाट्याने वाढ पाहिला मिळणार आहे. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. यासोबतच, जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक संधी मिळणार आहे. अशा परिस्थितीत पदोन्नतीसोबत पगारवाढी होणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप चांगला राहणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना खूप फायदे असणार आहे. तुम्ही अनेक सहली देखील प्लन करणार आहात.
या राशीच्या लोकांसाठी द्विदशा राजयोग अनुकूल ठरणार आहे. या राशीत बुध अकराव्या घरात तर शनि बाराव्या घरात असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना भौतिक सुख प्राप्त होणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होणार आहे. समाजात तुमचा आदर आणि लोकप्रियता वाढणार आहे. व्यवसायात तुम्हाला नवीन करार, नवीन करार किंवा अनेक नवीन प्रकल्प मिळणार आहेत. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकतो. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)