मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू बाथटाबमध्ये बुडून झाल्याचं वृत्त काही दिवसांपासून तिच्या चाहत्यांसह अनेकांसाठी धक्कादायक बाब आहे.
टबबाथमध्ये पडून मृत्यू होऊ शकतो या गोष्टीवर अनेकांचा विश्वास बसत नाही. पण जगभरात हजारो मृत्यू हे टबबाथमध्ये बुडल्याने होतात हे सत्य आहे.
अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये टबबाथ हे आवश्यक गोष्ट म्हणून ग्राहकांना दिली जाते. बाथटबच्या वापरामुळे एक व्यक्ती सुमारे 370 लीटर पाण्याचे नुकसान करते तर शॉवर बाथमुळे 70 लीटर पाण्यामध्ये काम होते. टबबाथमुळे जागादेखील खूप प्रमाणात वाया जाते.
#1 टबबाथजवळ एखादे पायपुसणं असणं आवश्यक आहे. तसेच हे पायपुसणं रबराचे असावे किंवा न सरकणारे असावे. यामुळे ओल्या पायाने घसरण्याचा धोका कमी होतो.
#2 बाथटब कधीच पूर्णपणे भरून त्यामध्ये उतरू नका. बाथटब 3/4 म्हणजेच पाऊण भाग भरल्यानंतरच त्यामध्ये उतरा. भरलेल्या टबबाथमध्ये उतरल्यास पाणी बाहेर पडण्याची शक्यता असते. यामुळे पाय घसरण्याची भीती असते.
#3 बाथटबमध्ये बाथ बॉम्बचा वापर करताना विशेष काळजी घ्या. बाथ बॉम्बमधील ग्रॅन्युएल्स त्रासदायक ठरण्याची शक्यता असते.
#4 तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना बाथटबजवळ एकट्याने पाठवू नका.
#5 बाथटबमध्ये इलेक्ट्रिक अप्लायन्सेसचा वापर करण्यापूर्वी काळजी घ्या. पाण्यात इलेक्ट्रिकचा प्रवाह सहज होतो. इलेक्ट्रिकच्या एखाद्या वस्तूचा वापर करणार असाल तर तो कोरड्या हातांनी करा.
#6 दारू किंवा अल्होहलचे सेवन केल्यानंतर टबबाथमध्ये जाणं टाळा. यामुळे अनेक धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकतात.