Kitchen Tips In Marathi: भेंडी ताजी असतील तरच त्याची चव टिकून राहते. बाजारातून भेंडी घरी घेऊन आल्यानंतरच लगेचच त्याची भाजी करावी. कारण भेंडी लवकर सुकतात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भेंडी ठेवून दिल्यास ती चिकट होतात आणि त्याला बुरशी लागते. त्यामुळं भेंडी फेकून द्यावी लागतात. दीर्घ काळापर्यंत भेंडी टिकून कशी ठेवावी, याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्स वापरुन तुम्ही काही आठवड्यांपर्यंत भेंडी फ्रेश ठेवू शकता.
आज आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या टिप्स वापरुन तुम्ही जास्तीत जास्त 15 दिवस भेंडी फ्रेश ठेवू शकता. एकदा तुम्हीदेखील हा पर्याय नक्की ट्राय करुन पाहा. भेंडी स्टोअर करत असताना सर्वात पहिले भेंडी निवडून घ्या. त्यातील कोवळी व फ्रेश भेंडी बाजूला काढून घ्या.
ताजी भेंडी कशी ओळखायची हा प्रश्न अनेक जणींना पडतो. सगळ्यात पहिले हलक्या हाताने भेंडी दाबून पाहा. त्यानंतर भेंडीच्या निमुळत्या भागाच्या तोडून पाहा. तर सहज भेंडी तुटली तर समजून घ्या भेंडी ताजी आहे.
भेंडी स्टोअर करण्यापूर्वी ती नीट स्वच्छ करुन घ्या. त्यासाठी पाण्यात एक चमचा व्हिनेगर टाकून ते नीट मिसळून घ्या. त्यानंतर या भांड्यात बाजूला काढून ठेवलेली भेंडी टाकून भिजवून घ्या. काही मिनिटांसाठी भेंडी तशीच भांड्यात ठेवून द्या. त्यानंतर चांगल्या पद्धतीने धुवून ती स्वच्छ करा.
भेंडी स्टोअर करताना तुम्हाला भाजीसाठी जशी भेंडी आवडते तशी कापून घ्या. त्यानंतर एका झिपलॉग बॅगमध्ये कापलेली भेंडी ठेवा आणि झिपलॉग बॅग बंद करा. मात्र बॅग बंद करताना त्यात थोडीसुद्धा हवा शिल्लक राहणार नाही, याची काळजी घ्या. त्यानंतर या झिपलॉक बॅग फ्रिजरमध्ये ठेवून द्या. फ्रोजन वाटाण्यासारखं तुम्ही फ्रोजन भेंडी स्टोअर करु शकता. काही जण वर्षभरदेखील अशाप्रकारे भेंडी स्टोअर करुन ठेवतात. तसंच, तुमच्या गरजेनुसार फ्रीजरमधून भेंडी काढून त्याची भाजी करु शकता. मात्र, झिपलॉक बॅग पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवताना संपूर्ण हवा काढून मगच फ्रीजरमध्ये ठेवा.
फ्रीजरमध्ये दीर्घकाळापर्यंत भेंडी ठेवल्याने त्याचा बर्फ जमा होत. अशावेळी भेंडीची भाजी करण्यापूर्वी साधारण १ ते अर्धा तास आधी भेंडी बाहेर काढून ठेवा. किंवा फ्रीजरमधून भेंडी बाहेर काढल्यानंतर गरम पाण्यात टाकून ठेवा. त्यानंतर थोडी नरम झाल्यानंतर भाजीसाठी भेंडी वापरा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)