Chhaava मधील 'कवी कलश' यांनी थिएटरमध्ये सादर केलं अश्रूंचा बांध फोडणारं 'ते' काव्य; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

Kavi Kalash Chhatrapati Sambhaji Maharaj Chhaava : विमीत कुमार सिंग हा कवी कलश यांची भूमिका साकारली आहे. तर थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला गेल्यानंतर त्यानं एक कविता सादर केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 20, 2025, 01:47 PM IST
Chhaava मधील 'कवी कलश' यांनी थिएटरमध्ये सादर केलं अश्रूंचा बांध फोडणारं 'ते' काव्य; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे title=
(Photo Credit : Social Media)

Kavi Kalash Chhatrapati Sambhaji Maharaj Chhaava : सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'छावा' या चित्रपटाची. व्हॅलेन्टाइन डेच्या निमित्तानं प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 33 कलेक्शन झालं. त्यानंतर हा चित्रपट सतत कमाईचं शिखर गाठताना दिसत आहेत. इतक्यात या चित्रपटानं त्याच्या बजेटच्या पलिकडे जाऊन कमाई केली आहे. विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. तर या चित्रपटात विमीत कुमार सिंग हा कवी कलश यांच्या भूमिकेत दिसत आहे. चंदोगामात्य कवी कलश हे मराठा योद्ध्यांसोबत लढणारे त्यांना पाठिंबा देणारे एक लोकप्रिय कवी होते. 

एकीकडे जिथे विकी कौशलच्या अभिनयाची स्तुती होत आहे. तर दुसरीकडे विनीत कुमार सिंगला देखील म्हटलं जात आहे की त्याच्या करिअरमधील हा सगळ्यात उत्तम रोल असेल. त्यानं इन्स्टाग्रामवर त्याच्या लूकला शेअर करत लिहिलं होतं की 'योद्ध्याचं हृदय असणारा कवी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जवळचा मित्र - कवी कलश.' विनीतनं कवी कलश यांच्या भूमिकेला जणू जिवंत केलं आहे. जेव्हा तो कविता ऐकवतो तेव्हा त्याचे हावभाव पाहून प्रेक्षकांना उड्या मारायला भाग पाडतात पण लढाईच्या वेळी त्यांचा आवाज मोठा होतो आणि त्यांच्या  आवाजानं सगळं काही शांत होऊन फक्त त्याकडेच लक्ष जातं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

दरम्यान, आता प्रत्यक्षात प्रेक्षकांना हा अनुभव घेता आला आहे. त्याचा व्हिडीओ एक प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की विनीत कुमारनं यावेळी त्याच्या चाहत्यांची थिएटरमध्ये जाऊन भेट घेतली. तिथे विनीतला पाहून प्रेक्षकांचा आनंद हा गगनात मावेना असा झाला. त्यांनी त्याच्या अभिनयाचं कौतूक केलं. त्यानंतर काही छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिला. त्यानंतर त्याला काही प्रेक्षकांनी कविता सादर करण्याची विनंती केली. त्यानंतर विनीतनं चित्रपटातील एक कविता सादर केली. 

वीर धीर तलवार हो, मर्द मराठा शूरवीर हो
युद्ध में कौशल गजब दिखावे,
रिपु दमन कर शंख बजावे।
जनम-मानस के भूप रहोगे,
चरम चमकती धूप रहोगे।
प्रसन्न रहे माता जगदंबा,
ओ छत्रपति, ओ सहचर संभा।

त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत विनीतचं कौतक केलं.