नाशिक : शहरातील प्रसिद्ध त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटरच्या संयुक्त विद्यमाने, संस्कृतीचा समृद्ध वारसा असलेल्या नाशिक शहरात 'एम फाईन'ची सुरुवात हा मैलाचा दगड आणि आरोग्य सेवांमध्ये एक नवीन पैलू आहे. 2017 मध्ये स्थापित 'एम फाईन' हे एक मागणीनुसार आरोग्यसेवा देणारा प्लॅटफॉर्म आहे जे अचूक निदान आणि आरोग्य तपासणी व इतर सेवा देते. ज्याचा लाभ घर किंवा ऑफिसमध्ये आरामात घेता येतो. 'एम फाईन'ने एका क्लिकवर सर्व समावेशक आरोग्य सेवांची एक नवीन व्याख्या केली आहे.
त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटर, 2005 मध्ये स्थापन झालेले आहे. नाशिकच्या रहिवाशांना अतिविशिष्ट निदान आणि पॅथॉलॉजी सेवा प्रदान करण्यासाठी एक आधारस्तंभ आहे. गेल्या 18 वर्षांपासून समाजाची सेवा करत असलेले त्रिमूर्ती डायग्नोस्टिक सेंटर हे नाशिकच्या आरोग्य सेवेतील एक विश्वासार्ह नाव बनले आहे.
सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवांचे महत्त्व ओळखून, एम फाईन ने त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटरशी सहयोग केला आहे. या सहयोगाचे उद्दिष्ट नाशिकच्या रहिवाशांसाठी सर्वसमावेशक हेल्थकेअर सोल्यूशन्स आणणे, रुग्णांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा सहज मिळू शकतील याची खात्री करणे हे आहे. एम फाईन आणि त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटर एकत्रितपणे नाशिकमधील हजारो रुग्णांसाठी आरोग्य सेवा अनुभव वाढवण्याचा प्रयत्न करतील.
लाइफसेल इंटरनॅशनल प्रा.लि चे एमडी आणि सीईओ. मयूर अभया एम फाईन आणि त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटर यांच्यातील प्रभावी युतीचे कौतुक करताना म्हणाले की , एम फाईन च्या अखंड ग्राहक अनुभवासह. 4500 पेक्षा अधिक चाचण्या आणि त्रिमूर्तीचे प्रादेशिक कौशल्य असलेली ही पर्टणरशीप शहरातील आरोग्य सेवेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. "आरोग्यसेवेचे भविष्य खरोखर येथे असल्याचे अभया यांनी सांगीतले.
त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटरचे डॉ. प्रमोद अहिरे, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट, म्हणाले की, आम्ही गेली १८ वर्षे नाशिकला सेवा देत आहोत आणि आता एम फाईन च्या सहकार्याने, आम्ही डायग्नोस्टिक सेवांच्या विस्तृत श्रेणीसह प्रगत पॅथॉलॉजी मेनू ऑफर करणार आहोत."
एम फाईन बद्दल
एम फाईन जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्समधील बाजारपेठेतील उच्च स्थानी असलेले नाव आहे. ए आय संचलित, मागणीनुसार आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म म्हणून उभे आहेत. जे वापरकर्त्यांना उच्च दर्जाच्या एकात्मिक आरोग्य सेवा आणि अत्याधुनिक आरोग्य व्यवस्थापन साधने आणि ट्रॅकर्समध्ये अखंड प्रवेश देतात. त्याच्या ISO 27001 प्रमाणपत्राद्वारे ओळखले जाणारे हे हेल्थ-टेक प्लॅटफॉर्म प्रख्यात रुग्णालये, विशेष डॉक्टर आणि मान्यताप्राप्त निदान प्रयोगशाळांसोबत सहयोग करते, ज्यामुळे त्याच्या वापरकर्त्यांसाठी विश्वासार्ह आणि व्यापक आरोग्य सेवेचा अनुभव मिळतो.
B2C मॉडेलसाठी एम फाईन चे मजबूत हेल्थकेअर नेटवर्क, संपूर्ण भारतातील 40 हून आधीक लॅब आणि 150 पेक्षा जास्त शहरांमध्ये 200 हूनआधीक अनुभव केंद्रांसह, तब्बल 8 लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. तर B2B मॉडेलमध्ये 2 हजार पेक्षा जास्त रुग्णालये, 10 हजार पेक्षा जास्त डॉक्टर आणि 5 हजाराहून आधिक पार्टनरस् सोबत जोडलेले आहोत.
देशाच्या प्रत्येक भागात सर्वांना परवडतील आशाआणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देतात. या पार्टनरशिप मुळे नाशिककरांना आता रेडिओलॉजी चाचण्यांसह ४५०० हून जास्त प्रगत पॅथॉलॉजी चाचण्यांचा देखील लाभ घेता येइल.
Disclaimer - This article is part of IndiaDotCom Pvt Ltd’s Consumer Connect Initiative, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility, liability or claims for any errors or omissions in the content of the article. The IDPL Editorial team is not responsible for this content.