Smiling depression Signs: राग, प्रेम, आनंद, दु:ख अशा विविध भावनेचा आचारीधिकारी म्हणजे माणूस. ज्यामध्ये भावना नाहीत, तो माणूस कसला? भावना ही जगाची एकमेव अशी भाषा आहे, जी प्रत्येकजण वाचू शकतो, त्याचबरोबर बोलू शकतो. इमोशन्स इस युनिव्हर्सल असं म्हणतात. रस्त्यावरच्या भिकाऱ्यामध्ये आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमधील कॉमन गोष्ट म्हणजे मनातील भावना. अशातच स्माईलिंग डिप्रेशन (Smiling depression) काय असतं जाणून घेऊया...
धगधगत्या जीवनशैलीमुळे नैराश्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढल्याचं पहायला मिळतंय. नैराश्याला कोणताही चेहरा किंवा भाव नसतो, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या हसण्यामागे उदासीनता असते, अनेकांच्या हसण्यामागे दुःख आणि चिंता दडलेली असू शकते. मात्र, ती वेळीच प्रकट होत नाही. तुमच्या आजूबाजूला अनेकजण स्माईलिंग डिप्रेशनची शिकार झालेली माणसं असू शकतात.
स्माईलिंग उदासीनता हा देखील एक प्रकारचा नैराश्याचा प्रकार आहे. ज्यामध्ये व्यक्ती सक्रिय, निरोगी कुटुंब, चांगली नोकरी, आशावादी असून देखील आनंदी नसतो. पिडित व्यक्ती बाहेरून आनंदी किंवा समाधानी दिसत असला तरी तो मानसिक विकारांनी ग्रासलेला असू शकतो.
उदासीनता अनुभवणारे लोकं आतून नैराश्याची वेदनादायक लक्षणं अनुभवत असतात. दीर्घकाळ दुःखी असणे हा देखील त्यातील एक प्रकार...
स्माईलिंग डिप्रेशन असलेल्या व्यक्तींना भूक, वजन आणि झोपेत बदल देखील जाणवतो. त्याचबरोबर थकवा किंवा सुस्त देखील जाणवू लागतं. मनामध्ये निराशेची भावना निर्माण होते. आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी करायला आवडतात, त्या करण्यात रस वाटत नाही.
अनेकांना आपण उदासीन आहेत हे देखील माहित नसतं, त्यामुळे यावर निदान करणं देखील अवघड आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, उदासीनता आणि क्लासिक डिप्रेशनमध्ये विरुद्ध किंवा वेगळी लक्षणं दिसून येतात. निदानासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. त्यावर वेळीच उपाय केला जाऊ शकतो.
दरम्यान, व्याख्येनुसार, डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल (DSM-5) मध्ये याचा समावेश केलेला नाही. मात्र, सध्याच्या तरुणांमध्ये ही लक्षणं दिसून येत आहेत. कोणत्याही बाबतीत माणूस समाधानी असणं गरजेचं असतं, असं म्हणतात. स्माईलिंग डिप्रेशनबाबत माणसाला आत्मविश्वास देणं गरजेचं आहे.