IND VS PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीचा चौथा सामना सुरु असून या हायव्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण जागाच लक्ष आहे. भारत - पाक सामना म्हटले की यात ऍक्शन आणि ड्रामाचा तडका लागतोच. या हायव्होल्टेज सामन्यात बऱ्याचदा खेळाडू एकमेकांशी भिडताना तुम्ही यापूर्वी देखील पाहिलं असेल. असाच राडा रविवारी झालेल्या भारत - पाक सामन्यात सुद्धा झाला. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि भारतीय गोलंदाज हर्षित राणा या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा 20 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार आणि फलंदाज मोहम्मद रिझवान स्ट्राईकवर होता. राणाने टाकलेल्या बॉलवर रिझवानने जोराचा शॉट खेळला. या शॉटनंतर धावा काढत असताना रिझवानने हर्षित राणाला धक्का दिला. हा धक्का जाणूनबुजून दिला गेला का हे रिझवानलाच माहित. परंतु या धक्क्यामुळे हर्षित राणाने नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत रिझवानने माफी सुद्धा मागितली नाही. 34 व्या ओव्हरला अक्षर पटेलने मोहम्मद रिझवानची विकेट घेतली. त्याने पाकिस्तानच्या कर्णधाराला बोल्ड आउट केले. रिझवानने 77 बॉलमध्ये 46 धावा केल्या यादरम्यान 3 चौकार मारले.
Harshit rana and Mohammad Rizwan shoulder to shoulder…. its heating in dubai INDvsPAK ChampionsTrophy pic.twitter.com/N9kucdOJwF
— Rahul Karki (Rahulkarki417) February 23, 2025
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस झाला. हा टॉस पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाही. तर पाकिस्तानने देखील तीच प्लेईंग 11 ठेवली असून फक्त दुखापतग्रस्त फखर जमा ऐवजी इमाम-उल-हक याला संधी दिली आहे. भारताच्या गोलंदाजांपैकी 37 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानच्या 5 विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा : नजर हटी दुर्घटना घटी! अक्षर पटेलच्या डायरेक्ट थ्रोने उडवले इमामचे स्टंप्स, निष्काळजीपणा अंगाशी आला
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद