Rohit Shrama wife Ritika Sajdeh: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला दुबईत (Dubai) सुरुवात झाली आहे. यजमान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी (Champions Trophy 2025) करण्याचा निर्णय घेतला. संथ गतीने टीम पाकिस्तान सध्या फलंदाजी करत आहे. या सामन्याला बघायला अनेक क्रिकेट चाहते आले आहेत तसेच खेळाडूंचे कुटुंबीयही आले आहेत. रोहित शर्माची बायको रितिकाही तिच्या मुलीसोबत सामना बघायला आली आहे. दरम्यान स्टेडियमचा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ज्यामध्ये रोहितची बायको रितिकसोबत एका फॅन गर्लने भारतीय जर्सी परिधान केली आहे पण खालची पॅन्ट घालायला विसरली असे वाटतं आहे.
भारतीय जर्सी परिधान केलेल्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामागचे कारण म्हणजे तिने घातलेली जर्सी. या मिस्ट्री गर्लने फक्त जर्सी घातली असून खाली काहीचं घातलेलं नाही असे व्हिडीओमध्ये दिसत आहे त्यामुळे नेटिझन्स ही पॅन्टच घालायला विसरली का? असं विचारात आहेत. याशिवाय तिच्या हातात डेनिम कापडाचे काहीतरी आहे त्यामुळे नेटिझन्स संभ्रमात आहेत की हे जॅकेट आहे की पॅन्ट आहे.
हे ही वाचा: IND vs PAK LIVE Score: पाकिस्तानची संथ फलंदाजी, वनडेमध्ये खेळतायत कसोटी सामना
जर तुम्ही व्हायरल झालेला व्हिडीओ नीट बघितला तर तुम्हाला दिसेल की या फॅन गर्लने डेनिम पँट नाही तर जॅकेट घेतले आहे. पण काही यूजर्स तिला ट्रोल करत म्हणत आहेत की, 'पँट हातात ठेवण्याची फॅशन कधीपासून झाली'.
हे ही वाचा: शिखर धवनसोबतची 'ही' मिस्ट्री गर्ल कोण होती? नेटिझन्स शोधत असलेली प्रोफाइल सापडली
Look who is here
The biggest supporter of boss Rohit Sharma and team India queen Ritika bhabhi at Dubai stadium for #INDvsPAK pic.twitter.com/53fCDozuyx
— (@rushiii_12) February 23, 2025
भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पोहोचली आहे. रितिकसोबतच ही मिस्ट्री गर्ल दिसत आहे.
हे ही वाचा: पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रोहितची मोठी मुलगी समायरा शर्मा देखील पत्नी रितिका सजदेहसोबत दिसत आहे.