'बाबा निराला' च्या भूमिकेला होकार देण्याआधी बॉबी देओलनं केली पत्नीशी चर्चा; तान्यानं दिलं होतं 'हे' उत्तर

Bobby Deol Aashram 3 : बॉबी देओलच्या 'आश्रम 3' या सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 23, 2025, 04:04 PM IST
'बाबा निराला' च्या भूमिकेला होकार देण्याआधी बॉबी देओलनं केली पत्नीशी चर्चा; तान्यानं दिलं होतं 'हे' उत्तर
(Photo Credit : Social Media)

Bobby Deol Aashram 3 : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलची वेब सीरिज 'आश्रम'नं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. प्रेक्षकांना ही सीरिज खूप आवडली आहे. या सीरिजचे आतापर्यंत 3 सीझन आले आहेत. आता सीरिजचा तिसऱ्या सीझनचा पार्ट 2 प्रदर्शित होणार आहे. पार्ट 2 रिलीज होण्या आधी बॉबी देओलनं सांगितलं की बाबा निरालाची भूमिका साकारण्या आधी पत्नीची परवानगी घेतली होती. बॉबी देओलनं सांगितलं की त्याची पत्नी तान्या देओलनं तेव्हा त्याला काय सांगितलं होतं. 

आश्रममध्ये बॉबी देओलनं बाबा निराला ही भूमिका साकारली आहे. त्याची भूमिका अशी आहे जी भोळ्या मुलींसोबत चुकीचे कृत्य करणारा आणि विविध गुन्हे करणारा आहे. बॉबी देओलनं नुकतीच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यानं त्याच्या पत्नीसोबत या भूमिकेबद्दल चर्चा केली होती. तो म्हणाला की त्यानं त्याच्या पत्नीला त्याची भूमिका कशी आहे हे सांगितलं. बॉबीनं त्याच्या पत्नीला सांगितलं की तो काही तरी मनोरंजक काम शोधण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला अजून कोणतीही योग्य संधी मिळाली नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

बॉबी देओलनं सांगितलं की त्याच्या पत्नीनं त्याला पाठिंबा दिला. त्याची पत्नी तान्या देओलनं त्याला सांगितलं की नाही, 'तू कर, तुझ्या मनाला वाटतं ते कर. ते कर. मी तुझ्यासोबत आहे. त्यानं सांगितलं की बाबा निरालासाठी त्यानं रोज तीन तास डायलॉग्स शिकायला आणि बोलण्यासाठी खूप मेहनत केली.' 

हेही वाचा : सिने वर्कर्सच्या मदतीला धावला विजय सेतुपती; दान केले 1.30 कोटी

बॉबी देओलचा आश्रमचा पहिला सीझन 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षक आतुरतेनं या आगामी सीझनची प्रतीक्षा करत आहेत. अर्थातच सीझन 3 च्या पार्ट 2 ची प्रतीक्षा करत आहेत. बॉबी देओलच्या या सीझनचा तिसऱ्या भागाचा पार्ट 2 हा 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तुम्ही ही सीरिज एमएक्स प्लेयरवर पाहू शकतात. दरम्यान, बॉबी देओलच्या 'आश्रम' या सीरिजनं सगळ्यांची मने जिंकली. याची क्रेझ ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून आहे.