Before Vicky Katrina Was Offered Chhaava Movie : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या छावा या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाच्या कमाईचा आकडा हा वाढत चालला आहे. इतकंच नाही तर हा चित्रपट रोज 30 कोटीं पेक्षा जास्तची कमाई करत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं जात आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत महत्त्वाच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसली होती. पण तुम्हाला माहितीये का की रश्मिका आणि विकी कौशल आधी या चित्रपटाची ऑफर ही विकीची पत्नी कतरिना कैफला झाली होती. पण कतरिनानं या चित्रपटाला नकार दिला होता.
विकी कौशलनं या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदानानं त्यांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की विकी आधी या चित्रपटाची ऑफर ही दुसऱ्या कोणाला देण्यात आली होती. सियासक डेलीच्या रिपोर्टनुसार, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सगळ्यात आधी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूला ऑफर करण्यात आला होता. तेलगू अभिनेता महेश बाबूनं या चित्रपटाला नकार दिला. त्यामुळे लक्ष्मण उतेकर यांनी विकी कौशलला या चित्रपटाची ऑफर दिली.
रिपोर्ट्सनुसार, हे देखील सांगण्यात आलं की रश्मिका मंदाना आधी छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी येसुबाईंच्या भूमिकेची ऑफर ही कतरिना कैफला देण्यात आली होती. पण तिनं काही कारणांमुळे ती हा चित्रपट करु शकली नाही.
दरम्यान, विकी कौशलवर संपूर्ण भारत आणि परदेशातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटातील त्याचा अभिनय, त्यानं केलेलं अॅक्शन आणि त्या आधी त्यानं कशा प्रकारे या चित्रपटासाठी तयारी केली ते पाहून सगळ्यांना खूप जास्त आश्चर्य झालं आहे. फक्त विकी नाही तर त्यासोबत रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, डायना पेन्टी, आशुतोष राणा, दिव्या दत्त, विनीत कुार सिंगसोबत इतरांनी देखील या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. सगळीकडे या सगळ्यांचं कौतूक करण्यात येत आहे. तर अक्षय खन्नानं या चित्रपटात मुघल राजा औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. तर यावेळी त्यानं केलेल्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहे.
हेही वाचा : अनेक वर्षांपासून मानधन न घेता चित्रपट करणारा आमिर खान नेमके पैसे कमवतो तरी कसा?
'छावा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचं झालं तर वर्ल्डवाइड कलेक्शन 400 कोटींचं झाल्याचं म्हटलं जात आहे.