Aamir Khan Movie Fees : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान हा जवळपास गेल्या 37 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्यानं त्याच्या करिअरमध्ये अनेत सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का की आमिरनं जवळपास 20 वर्षांपासून चित्रपटांसाठी मानधन घेतलेलं नाही, अर्थात इतर कलाकार घेतात तशी. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिरनं सांगितलं की तो चित्रपटांसाठी काही ठरावीत असं मानधन घेत नाही. त्याचं मानधन हे चित्रपट फ्लॉप आणि हिट ठरण्यावर अवलंबून असतं.
आमिर खाननं नुकतीच ABP ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यानं सांगितलं की जर त्याचा चित्रपट चालत असेल तरच त्याला पैसे मिळतात नाही तर त्याची कमाई होत नाही. आमिर खान याविषयी म्हणाला की 'जर चित्रपट हिट झाला तर मी मानधन कमावतो आणि जर फ्लॉप ठरला तर मला कधीच काही मिळत नाही.' त्याचं मानधन हे त्याच्या चित्रपटाच्या परफॉर्मेन्सवर अवलंबून राहतो. चित्रपट फ्लॉप झाला तर आमिर त्याच्या निर्मात्यांवर मानधनावरून काही बोलत नाही.
चित्रपटाच्या बजेटवर बोलताना आमिरनं सांगितलं की 'कोणत्याही चित्रपटातून त्याच्या प्रोडक्शन कॉस्टला मिळवण्यासाठी चित्रपटानं कमीत कमी 20-30 कोटींची कमाई करणं गरजेच असतं. त्यानं सांगितलं की जर कोणत्या चित्रपटाचं बजेट हे 200 कोटी रुपये असेल आणि कलाकार खूप जास्त मानधन घेत आहेत. अशात जर चित्रपट फ्लॉप झाला तर बजेट कसं निघेल?'
आमिरनं पुढे सांगितलं की 'ही काही नवीन पद्धत नाही, खरंतर हीच सगळ्यात जुनी पद्धत होती, जी आजही यूरोपमध्ये सुरु आहे. आमिरनं सांगितलं की मी सगळ्यात जुन्या पद्धतीचं पालन करतो, त्यामुळे मला संपूर्ण मोकळेपणा मिळतो आणि त्यामुळे त्याला वेगवेगळे प्रयोगही करता येतात.'
दरम्यान, आमिर खानचे चित्रपट हे वेगळ्याच विषयांवर असतात. त्याचे चित्रपट हे कोणत्या तरी विषयावर लक्ष केंद्रित असतात. दरम्यान, या आधीचा त्याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट आणि त्यासोबत ठग्स ऑफ हिंदोस्तान हे दोन्ही त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाही. या चित्रपटांमधून आमिर खानला जास्त मानधन किंवा कमाई झालेली नाही.