Rajesh Khanna's Rumoured Girlfriend Anita Advani : दिवंगत दिग्गज अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे 1973 मध्ये झाली होती. पण एक दशकापेक्षा कमी काळात ते विभक्त झाले. पण त्यांनी एकमेकांना कधी घटस्फोट दिला नाही. राजेश यांनी कथितपणे 2004 अभिनेत्री अनीता आडवाणी यांच्यासोबत राहण्यास सुरुवात केली आहे आणि 2012 मध्ये त्यांचं निधन होईपर्यंत ते एकत्र राहत होते. दरम्यान, नुकत्यात एका मुसाखतीत अनीता यांनी सांगितलं की त्या करवा चौथ दरम्यान, त्यांच्यासाठी उपवास ठेवायच्या. पण आरोप असे केलेत की कधीकधी तिचे शारीरिक शोषण करत असे. त्याने कबूल केले की ती त्याला मारहाणही करायचे.
YouTube चॅनल अवंती फिल्म्सवर एक चॅटमध्ये अनीतासोबत त्यांच्या नात्याविषयी विचारण्यात आलं. कारण त्यांनी कधी एकमेकांशी लग्न केलं नाही. त्यावर अनीतानं सांगितलं की 'त्यांनी मला बालाजीच्या समोर एक कानशिलात लगावली होती. त्यांनी मला स्वीकारलं.' त्या पुढे म्हणाल्या की 'या आधी 28 वर्षांपर्यंत त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. कारण ते आधीच डिंपलपासून विभक झाले होते.'
जेव्हा त्यांना त्यांच्या स्वभावाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की 'त्यांचा शांत स्वभाव होता आणि हिंसक नव्हते. पण याच्यापुढेच ते म्हणाले की पण ते कधी कधी मला मारायचे. त्यामुळे मी देखील त्यांना परत मारायचे. ही माझी त्यांच्या मारण्यावर असलेली प्रतिक्रिया आहे. ते तक्रार करायचे की माझ्या नखांनी त्यांना जखम झाली.'
यावेळी अनीता यांना राजेश आणि डिंपल यांच्या नात्याविषयी विचारण्यात आले की इतका काळ लांब राहिल्यानंतरही त्यांना घटस्फोट घेतला नाही. तर त्या म्हणाल्या, 'मी त्यांच्यावर कमेंट करणार नाही. ते त्यांचा खासगी प्रश्न आहे. त्यांना माहित होतं की ते असं का करु शकत नाही.'
हेही वाचा : 'तो ड्रग्स तर...'; वर्षाला 5 चित्रपट करण्यावरून अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना परेश रावलचं सडेतोड उत्तर
2012 मध्ये राजेश खन्ना यांचं निधन झालं त्यानंतर अनीता आडवाणी यांनी 2013 मध्ये बिग बॉस 7 मध्ये भाग घेतला. त्यावेळी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आरोप केला होता की 'ते मद्यपान करून त्यांना मारायचे. त्यांच्यासोबत राहणं कठीण होतं. एक किंवा दोन ड्रिंक घेतल्यानंतर ते असभ्य सारखे वागायचे. त्यांचा मूळ स्वभाव हा त्यावेळी कळायचा. मी त्यांना कसं सांभाळायचं हे शिकले. आधी मी त्यांच्याशी भांडायचे आणि वाद घालायचे. त्यानंतर त्यांनी मला समजावलं की तू फक्त इतकं बोल, मी चूक असेन, पण शांत राहा.'