पहिलाच स्टंट आणि गंभीर दुखापत; Guru Randhawa चा रुग्णालातील फोटो VIRAL

Guru Randhawa Accident : गुरु रंधावानं शेअर केला रुग्णालयातील फोटो व्हायरल, पहिला स्टंट आणि गंभीर दुखापत... 

दिक्षा पाटील | Updated: Feb 23, 2025, 12:38 PM IST
पहिलाच स्टंट आणि गंभीर दुखापत; Guru Randhawa चा रुग्णालातील फोटो VIRAL
(Photo Credit : Social Media)

Guru Randhawa Accident : लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता गुरु रंधावाच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. गुरु रंधावाचा गंभीर अपघाता झाला आहे. त्याची माहिती त्यानं स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्याला झालेल्या या गंबीर दुखापत नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि याची माहिती स्वत: गुरु रंधावानं दिली आहे. त्यानं रुग्णालातील बेडवरून हा फोटो शेअर केला आहे. 

गुरु रंधावानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो रुग्णालयाच्या बेडवर असल्याचं दिसून येत आहे. त्याशिवाय त्याची सर्जरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याच्या डोक्यालापण बॅन्डेज केल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत गुरु रंधावानं कॅप्शन दिलं की ‘शौंकी सरदार’ च्या सेटवर असलेले अ‍ॅक्शन सीन्स खूप कठीण होते, पण त्याच्या चाहत्यांसाठी त्यानं हे केल्याचं त्यानं म्हटलं. गुरु रंधावा म्हणाला, 'माझा पहिला स्टंट, माझी पहली दुखापत पण तरी सुद्धा माझ्यात असलेला उत्साह हा कमी झालेला नाही. शौंकी सरदारच्या सेटवरची एक आठवण. अ‍ॅक्शन सीन्स करणं खूप कठीण आहे पण माझ्या प्रेक्षकांसाठी नक्कीच मेहनत करेन.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

गुरु रंधावानं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी आणि त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं. तर अनेकांनी त्याचं कौतूक केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'गुरु भाऊ, तुझ्यात असलेल्या हिंम्मतीचं कौतूक. तू लवकर ठीक हो ही प्रार्थना. आम्हाला तुमचा चित्रपट पाहायचा आहे आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू केलेल्या मेहनतीला सलाम. पण तुझी काळजी घे.'

हेही वाचा : 'ते कधी कधी मला मारायचे आणि मी...', राजेश खन्नांच्या गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

गुरु रंधावा ‘शौंकी सरदार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट अ‍ॅक्शन आणि ड्रामा आहे. यात गुरु रंधावा त्याच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. आता त्याचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे. सध्या गुरु रंधावाची तब्येतीला घेऊन कोणतीही अपडेट नाही. पण ज्यांना तो आवडतो ते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत.