पंतप्रधानांच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे, तुम्हाला माहिती असायला हवेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं 

Updated: Aug 15, 2020, 11:45 AM IST
पंतप्रधानांच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे, तुम्हाला माहिती असायला हवेत title=

नवी दिल्ली : आज ७४ व्या स्वातंत्र्यता दिवसाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं आणि अनेक घोषणा केल्या. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत, इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, वोकल फॉर लोकल यावर भर देण्यास सांगितले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात १० महत्वाचे मुद्दे सांगितले. जे सर्व जनतेला माहिती असणं गरजेचं आहे. 

२) वन नेशन वन टॅक्स : गेल्यावर्षी भारताने प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड तोडलेयत. भारतात प्रत्यक्ष गुंतवणुकीत १८ टक्क्यांनी वाढ झालीय. आज जगातील मोठमोठ्या कंपन्यांचे देशाकडे लक्ष आहे. मेक इन इंडीया सोबतच मेक फॉर वर्ल्डचा मंत्र घेऊन भारताला पुढे जायचय. 

३) 'सामर्थ्य्मूलं स्वातंत्र्य, श्रममूलंच वैभवम्', हे कोणताही समाज, कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा स्त्रोत आणि सामर्थ्य असते. मेहनत, शक्ती ही त्याच्या वैभव, प्रगतीचा स्त्रोत असते. देशातील कोणत्याही शहर किंवा गावात राहणारा सामान्य नागरिक त्याची मेहनतीला श्रेष्ठ आहे.

४)कोट्यावधी गरीबांना मोफत गॅस सिलेंडर दिले गेले. ८० कोटींहून जास्त  रेशनकार्ड असले किंवा नसलेल्यांनाही अन्नाची व्यवस्था करण्यात आलीय बॅंक खात्यामध्ये ९० हजार कोटी थेट ट्रान्सफर करण्यात आले. गरीबांच्या हातात थेट पैसे पोहोचतील.

५) वोकल फोर लोकल, रि स्किल आणि अप स्किलचे अभियान दारीद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आत्मनिर्भर करेल. ११० हून अधिक जिल्हे निवडून तिथे विशेष प्रयत्न केले जातील. तिथल्या लोकांना चांगले शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या समान संधी मिळतील. 

६) आत्मनिर्भर भारतचा अर्थ केवळ आयात कमी करणे नसून आपली क्षमता वाढवणे ही आहे. क्रिएटीव्हीटी आणि स्किल वाढवावी लागेल. काही महिन्यांपुर्वी एन ९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटीलेटर हे सर्व आपण विदेशातून मागवत होतो. आज भारताने स्वत:च्या गरजा पूर्ण केल्यायत. तसेच दुसऱ्या देशांना देखील मदतीसाठी पुढाकार घेतलाय.

७) एक वेळ असा होता जेव्हा आपली कृषी व्यवस्था पिछाडीवर होती. देशातील नागरिकांचे पोट कसे भरावे हा प्रश्न होता. पण आता आपण देशासोबत जगातील कित्येक देशांचे पोट भरु शकतो. आत्मनिर्भर कृषि आणि आत्मनिर्भर शेतकरी ही आपली प्राथमिकता आहे. देशातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक इंफ्रास्ट्रक्चर देण्यासाठी काही दिवसांपुर्वी एक लाख कोटी रुपयांचा एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्ररक्चर फंड बनवण्यात आलाय.

८) मध्यम वर्गातून आलेले प्रोफेशनल्स जगात आपली ताकद दाखवतायत. मध्यम वर्गाला संधी द्यायला हवी. घराच्या ईएमआयमध्ये ६ लाख रुपयांपर्यंतची सूट देण्यात आलीय. गेल्या वर्षांमध्ये हजारो घर बनवण्याची कामे पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटींच्या फंडची स्थापना झालीयं. 

९) डिजीटल भारत अभियानाचे महत्व कोरोना काळात जास्त कळाले. गेल्या महिन्यात साधारण ३ लाख कोटींचे ट्रान्झाक्शन झाले. गेल्या पाच वर्षात ६० हून अधिक गावांना ऑप्टील फायबरशी जोडली गेली आहेत. येणाऱ्या एक हजार दिवसात देशातील प्रत्येक गाव ऑप्टीकल फायबरने जोडले गेलंय. 

१०) भारतात महिला कोळसा खाणीत करण्यापासून लढाऊ विमानांतून आकाशाला गवसणी घालतायत. ४० कोटी जनधन खाते उघडण्यात आलेयत. २२ कोटी खाती महिलांची आहेत.